उन्हाळ्यात रोज ताक पिता? ताक पिताना 'या' चुका करू नका, अन्यथा कधीही तब्येत बिघडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 15:39 IST2026-04-16T15:19:27+5:302026-04-16T15:39:37+5:30
Avoid These Mistake while Drinking Buttermilk : उन्हाळ्यात बाहेर मिळणाऱ्या ताकात दूषित पाण्याचा वापर असू शकतो. ज्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता असते.

उन्हाळ्याच्या दिवसांत ताक पिणं गुणकारी ठरतं पण ताक पिताना काही नियम पाळायला हवेत. ताक पिताना काही चुका करणं टाळावं. (Avoid These Mistake while Drinking Buttermilk)

रात्री ताक प्यायल्यानं कफ, खोकला किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. ताक नेहमी सुर्योद्यानंतर आणि सुर्यास्तापूर्वी प्यावे

अतिशय थंड ताक प्यायल्यानं घसा खराब होऊ शकतो आणि पचनशक्ती मंदावते. माठातील थंड ताक पिणं केव्हाही उत्तम ठरतं.

खूप दिवस ठेवलेलं किवा जास्त आंबट झालेलं ताक पिऊ नका. यामुळे पित्त वाढू शकते आणि घशात जळजळ होऊ शकते.

ताकात साखर घालून पिणं टाळावं. त्याऐवजी जिरं पूड, काळं मीठ घातल्यास ते अधिक पाचक ठरते.

जेवणानंतर लगेच खूप पातळ ताक पिण्याऐवजी थोडं घट्ट ताक प्यावं जेणेकरून पचन व्यवस्थित होईल.

ताक पिताना किंवा प्यायल्यानंतर लगेच फळं खाऊ नयेत. यामुळे शरीरात विरूद्ध आहार तयार होऊन त्वचेचे विकार होऊ शकतात.

खूप गरम अन्न किंवा थंड ताक एकाचवेळी पिऊ नये. यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो.

उन्हाळ्यात बाहेर मिळणाऱ्या ताकात दूषित पाण्याचा वापर असू शकतो. ज्यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता असते.

जर तुम्हाला एसिडीटीचा खूपच त्रास असेल तर सकाळी रिकाम्यापोटी अति आंबट ताक पिऊ नका. यामुळे त्रास वाढतो.

















