ब्लाऊजच्या बाह्यांचे ५० सुंदर डिझाइन्स, पाहा नवे पॅटर्न-नवी स्टाइल! बदलून जाइल तुमचा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 17:59 IST2026-04-28T16:26:26+5:302026-04-28T17:59:15+5:30

50 Trendy Designs of Blouse Sleeves : ब्लाऊजला सोयीनुसार पुढे, पाठीमागे किंवा बाजूला चेन लावून शिवता येते.

सध्या ब्लाऊज शिवण्याचे नवनवीन पॅटर्न्स आले असून ते तुमच्या लेहेंग्याचा किंवा साडीचा लूक पूर्णपणे सुंदर करू शकतात. (50 Trendy Designs of Blouse Sleeves)

हातांच्या डिझाईन्समध्ये पफ स्लिव्हज, कोपरापर्यंतचे हात किंवा स्लिव्हजलेस असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. (Unique Blouse Sleeves Designs)

ब्लाऊजच्या पाठीमागच्या भागासाठी दोरी, मटका गळा, की होल किंवा पूर्णपणे बंद असे प्रकार शिवता येतात.

बाह्यांच्या लांबीनुसार स्लिव्हलेस, आखूड बाह्या, कोपरापर्यंतच्या बाह्या किंवा पूर्ण बाह्या असे प्रकार असतात. यात पफ स्लिव्हजच आणि बेल स्लिव्हज सध्या ट्रेंडींग आहेत.

ब्लाऊजच्या फिटिंगसाठी प्रिन्सेस कट, कटोरी ब्लाऊज, मद्रास कट किंवा साध्या टक्सचा वापर केला जातो.

ब्लाऊजला सोयीनुसार पुढे, पाठीमागे किंवा बाजूला चैन लावून शिवता येते. अधुनिक कपड्यांमध्ये आणि ट्रेंडी लूकसाठी पॅडेड ब्लाऊज शिवण्याकडे महिलांचा कल वाढला आहे.

ब्लाऊजला अधिक आकर्षक करण्यासाठी त्यावर जरदोरी काम, एम्ब्रॉयडर लेस किंवा गोंडे लावून कस्टमाईज केले जाते.

कॉटन ब्लाऊज हे प्रामुख्यानं आरामदायी आणि सोबर लूकसाठी ओळखले जातात. हातांच्या शेवटी बारीक लेस लावल्यास प्रोफेशनल आणि मोहक लूक मिळतो.

कॉटनचं कापड कडक असल्यामुळे फुग्याच्या बाह्या खूप छान दिसतात.

यामध्ये खांद्यापाशी फुगा असलेला पारंपारीक प्रकार किंवा अधुनिक प्रकार शिवता येतो.