'सेमीफाइनल'ची तयारी - भाजपवर 5 राज्यांत विजयासाठी दबाव, 2024 साठी खास रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 06:43 PM2021-11-09T18:43:30+5:302021-11-09T18:54:07+5:30

Five states assembly elections 2022 : या निवडणुकांत, भाजपवर एक मानसिक दडपणही आहे आणि ते म्हणजे, त्यांनी एकदा सरकार बनवल्यानंतर, त्यांना पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. कधी कधी सत्ताविरोधी कारभारामुळे सरकारच्या बाहेर राहावे लागते.

पुढील काही महिन्यांत उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. या विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरून भाजप आणि काँग्रेस (BJP and congress) लोकसभेकडे जाणाऱ्या कॉरिडॉरचे मूल्यांकन करतील. केवळ या पाच राज्यांतच लोकसभेच्या सुमारे 20 टक्के जागा आहेत. यामुळेच भाजप आणि काँग्रेसने 2024 साठी त्यांच्या संपूर्ण रोड मॅपवर लक्ष केंद्रित केले आहे.

या निवडणुकांत, भाजपवर एक मानसिक दडपणही आहे आणि ते म्हणजे, त्यांनी एकदा सरकार बनवल्यानंतर, त्यांना पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. कधी कधी सत्ताविरोधी कारभारामुळे सरकारच्या बाहेर राहावे लागते.

2022 मध्ये 2024 चं सेमीफायनल - उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये लोकसभेच्या 102 जागा आहेत. लोकसभेच्या सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशात - ८०, पंजाबमध्ये - १३, उत्तराखंडमध्ये पाच, गोव्यात दोन आणि मणिपूरमध्ये दोन आहेत. या सर्व जागा देशातील एकूण लोकसभेच्या 20 टक्के जागांच्या जवळपास आहेत. अशा स्थितीत, भाजप आणि काँग्रेस या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांकडे 2024 च्या निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहत आहेत.

भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत ज्या पद्धतीने योजना आखण्यात आली आहे, ती केवळ 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठीच नाही, तर लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्या आखल्या गेल्या आहेत.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यांच्या निकालांवरून 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत किती मेहनत घ्यावी लागेल हे स्पष्ट होईल.

काही दिवसांपूर्वी विशेषत: हिमाचल प्रदेशातील पोटनिवडणुकीत ज्या पद्धतीने निकाल आले आहेत, तो पक्षासाठी निश्चितच चिंतेचा विषय आहे. पण त्यात सुधारणा करण्यासंदर्भात संपूर्ण योजना तयार करण्यात आल्याचेही सुत्रांनी म्हटले आहे.

बूथ मजबूत करणार - भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी झालेल्या बैठकीत लोकसभेच्या दृष्टीने तयारी करावी, असा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या पद्धतीने पुढील वर्षी पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकींच्या संभाव्य निकालाच्या तारखांनंतरची रूपरेखा तयार करून पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांना टास्क देण्यात आला आहे. त्यावरून स्पष्ट होते, की तयारी केवळ 2022 साठीच नाही, तर 2024 चीही सुरू आहे.

यात बूथ स्तरावर संघटना मजबूत करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. 2022 च्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात, संबंधित प्रभारींना त्याचा अहवाल सादर करावा लागेल. हे सर्व अहवाल 2022 अखेर हायकमांडला सादर करण्याची मुदत निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील सूचनांवर काम केले जाईल.

काँग्रेसचा फोकस उत्तर प्रदेशवर - काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका गांधी ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशमध्ये सक्रिय झाल्या आहेत, त्यामुळे निश्चितपणे उत्तर प्रदेशच नव्हे तर पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये विशेष संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रियांका गांधी यांचे संपूर्ण लक्ष उत्तर प्रदेशवर असले तरी, सुत्रांच्या मते, उत्तर प्रदेशातील निकालांच्या आधारेच प्रियंका गांधी 2024 मध्ये नव्या जबाबदारीसह मैदानात उतरवले जाईल.