PV Sindhuचं सौंदर्य पाहून घायाळ झाले चाहते; दोन लाखांच्या साडीतील लूकची चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 07:06 PM2021-08-16T19:06:29+5:302021-08-16T19:19:23+5:30

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या पी व्ही सिंधूच्या साडीतील लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. बॅडमिंटनपटू सिंधूनं सफेद साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या पी व्ही सिंधूच्या साडीतील लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत. बॅडमिंटनपटू सिंधूनं सफेद साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

बॅडमिंटन कोर्टवर प्रतिस्पर्धी खेळाडूंना सहज धुळ चारणारी सिंधू साडीत सुंदर दिसत आहे. प्रसिद्ध फोटोग्राफर अनिल कुमार यांनी सिंधूच्या फोटोचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला.

सिंधूच्या या साडीचं डिझाईन मनीष मल्होत्रा यांनी केलं आहे. या साडीची किंमत १.९५ लाख आहे.

टोकियोतील या कांस्यपदकासह ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिनं रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते.