वर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2018 09:54 PM2018-08-19T21:54:35+5:302018-08-19T22:14:01+5:30

11 सप्टेंबर 2001 मध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवादी हल्ला झाला होता, विमान अपहरण करुन टॉवरवर विमान धडकविण्यात आले होते. त्या क्षणाची ही छायाचित्रे व्हायरल झाली होती.

सन 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले होते, पण भारत पाकिस्तानच्या फाळणीमुळे आनंदातही एक दु:ख भारतीयांच्या मनात लपले होते

दिल्लीतील जंतरमंतरवर होत असलेल्या एका आंदोलनावेळी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्यापूर्वीचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

3 सप्टेंबर 1984 साली भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती, त्यावेळी गॅस दुर्घटनेत कित्येक निष्पापांचा जीव गेला होता, तेव्हाचा हा एका चिमुकल्याचा फोटो काळजात चिर्र करुन जातो.

सन 1946 साली मुस्लीम लीगने हिदुंविरुद्ध डायरेक्ट एक्शन फर्मान काढले होते. त्यामध्ये पूर्व बंगालमधील नोआखाली जिल्हा या फर्मानाचा बळी ठरला होता, त्यामुळे कोलकात्याला स्मशानरुप प्राप्त झाले होते.

26 नोव्हेंबर 2008 साली पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत घुसून धुडगूस घासला होता. या दहशतवादी हल्ल्यात शेकडो नागरिकांचा जीव गेला. हॉटेल ताजचा हा फोटो आजही काळजावर घाव घालत डोळ्यात अश्रू आणतो.