मोदी-राहुल गांधींनंतर आता बाजारात आल्या सर्जिकल स्ट्राइकची प्रिंट असलेल्या साड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 07:19 PM2019-02-25T19:19:21+5:302019-02-25T19:38:28+5:30

विविधरंगी, वेगवेगळ्या डिझाइन्स असलेल्या साड्या तुम्ही बाजारात पाहिल्या असतीलच. हल्ली तर नेत्यांची छायाचित्रे असलेल्या साड्याही बघण्यात आल्या असतील. आता तर चक्क सर्जिकल स्ट्राइकचे चित्रण केलेली साडी बाजारात आली आहे.

उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने ज्याप्रकारे सीमारेषा ओलांडून सर्जिकल स्ट्राइक केली होती, त्याचे चित्रण या साड्यांवर केले आहे.

भारतीय लष्कराच्या पराक्रमाला अभिवादन करण्याचा प्रयत्न याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. तसेच उरी आणि पुलवामा येथील शहिदांना श्रद्धांजली देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेल्या साड्या बाजारात आल्या होता. त्याची चर्चाही खूप झाली होती.

मोदींनंतर राहुल गांधीची प्रतिमा प्रिंट असलेल्या साड्याही बाजारात आल्या होत्या.

प्रियंका गांधींच्या राजकारणातील प्रवेशानंतर त्यांची प्रतिमा प्रिंट असलेल्या साड्याही बाजारात आल्या होत्या.