Last Sunset Of The Year 2021: सूर्य आता निजतो आहे... यंदाच्या वर्षातील शेवटच्या सूर्यास्ताचं मनमोहक रूप; पाहा Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 07:43 PM2021-12-31T19:43:23+5:302021-12-31T20:00:59+5:30

Last Sunset Of The Year 2021 : २०२१ हे वर्ष विविध घटनांनी आणि आठवणींनी समृद्ध झालं. यात अनेक प्रसगांना तुम्हा-आम्हा सर्वांना सामोरं जावं लागलं. यातील सर्व कटू आठवणी बाजूला ठेवून आणि चांगल्या गोष्टी गाठीशी बांधून पुढे जाण्याची वेळ आली आहे. यंदाच्या वर्षाच्या अखेरच्या मावळत्या सूर्याचं दर्शन घेऊन वर्षाचा शेवट गोड करुयात. पाहा Photos...

२०२१ चा सूर्य आता मावळला आहे आणि आता वेध लागलेत २०२२ चे. नववर्षासाठी नवे संकल्प आणि उद्दीष्ट समोर ठेवून नववर्षाचं स्वागत सर्व करण्यासाठी सज्ज आहेत. पण कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाहीची चिंता नागरिकांना सतावत आहे. सरत्या वर्षाचा शेवट मावळत्या सूर्याचं दर्शन घेऊन करुयात. केरळच्या कोलावम बीजवरील सूर्यास्ताचं हे मनमोहक रुप. (छाया सौजन्य- ANI)

दिल्लीतील विजय चौक येथून टिपलेलं मावळत्या सूर्याचं तेजस्वी रूप (ANI)

केरळच्या तिरुवअनंतपुरम येथील समुद्र किनारी टिपण्यात आलेला सूर्यास्त (ANI)

मुंबईतील जुहू चौपाटीवरील सूर्यास्ताचं दर्शन.

दिल्लीच्या विजय चौक परिसरातील सूर्यास्त.

दिल्लीच्या यमूना नदी काठी टिपण्यात आलेल्या सूर्यास्ताचं नयनरम्य दृश्य.

मुंबईत कोरोनामुळे निर्बंध लागू असतानाही जुहू चौपाटीवर अजूनही तुरळक स्वरुपात गर्दी पाहायला मिळत आहे.

मुंबईतील मरिन ड्राइव्ह येथील सूर्यास्त.

२०२१ वर्षातील अखेरच्या सूर्यास्तचं ओडिशामधील पुरी येथे टिपलेलं दृश्य.