Flashback 2020 : तुम्ही कायम आमच्या स्मरणात आहात...; "या" दिग्गजांनी घेतला जगाचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 12:48 PM2020-12-31T12:48:01+5:302020-12-31T13:41:34+5:30

Flashback 2020 : 2020 मध्ये अनेक दिग्गज मंडळींनी जगाचा निरोप घेतला आहे.

2020 मध्ये अनेक दिग्गज मंडळींनी जगाचा निरोप घेतला आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे 31 ऑगस्ट रोजी निधन.

केंद्रीय मंत्री व लोकजनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचे 8 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराने निधन झाले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि गांधी घराण्याचे निकटवर्ती अहमद पटेल यांचे 25 नोव्हेंबर रोजी कोरोनामुळे निधन झाले.

भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह 27 सप्टेंबरला कालवश.

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यांचे एकेकाळचे निकटवर्ती असलेल्या अमरसिंह यांचे 1 ऑगस्ट रोजी सिंगापूर येथील एका रुग्णालयात निधन झाले.

प्रख्यात कवी राहत इंदोरी यांचे 11 ऑगस्ट रोजी इंदूर येथे निधन झाले.

प्रख्यात दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे 17 ऑगस्ट रोजी निधन झाले.

कसदार अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता यांचे 22 सप्टेंबर रोजी कोरोनामुळे निधन झाले.

आनंदवनातील डॉ. शीतल आमटे यांनी 30 नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली. त्यानंतर खळबळ उडाली.

एमडीएच मसालेचे मालक महाशय धर्मपाल यांचे 3 डिसेंबर रोजी वृद्धापकाळामुळे निधन.

अवघ्या ४१ वर्षाच्या या महान अमेरिकी बास्केटबॉलपटूचा 25 जानेवारी रोजी विमान अपघातात मृत्यू झाला.

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे जगभरात अनेक चाहते होते.

इंग्रजीचे प्राध्यापक आणि भविष्यकार असलेले बेजान दारूवाला 29 मे रोजी कालवश झाले.

रूपेरी पडद्यावरचा पहिला जेम्स बॉण्ड शॉन कॉनरी 31 ऑक्टोबर रोजी काळाच्या पडद्याआड गेला.

भारतातील आयटी युगाचे संस्थापक असे संबोधले जाणाऱ्या फकीरचंद कोहली यांचे 26 नोव्हेंबर रोजी निधन झाले.

बॉलिवूडच्या पहिल्या घराण्याचे वारसदार असलेले अभिनेते ऋषी कपूर यांनी 30 एप्रिल रोजी घेतलेली काळाच्या प़डद्यावरील एक्झिट अनेकांच्या हृदयाला चटका लावून गेली.

अभिनेता इरफान खान यांचं 29 एप्रिल रोजी निधन झालं.

मास्टरजी म्हणून बॉलिवूडमध्ये परिचित असलेल्या नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे 3 जुलै रोजी निधन झाले.

छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला.