जाडेपणाला कंटाळून सोडून गेला पहिला बॉयफ्रेंड; अन् आता नवा पाहून सगळ्यांचीच उडाली झोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2021 06:43 PM2021-02-08T18:43:56+5:302021-02-08T19:03:00+5:30

सध्या व्हेंलेटाईन वीक सुरू आहे. या आठवड्यात कपल्स एकमेकांना स्पेशल फील करून देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात. पार्टनरच्या सुख, दुःखात साथ देऊन पुढे चालत राहण्याचे काम कपल्सचे असते. पण अनेकजण असे असतात जे पार्टनरच्या वीक पॉईंटचा फायदा घेत सोडून निघून जातात.

. कॅनडाच्या रहिवासी असलेल्या २३ वर्षीय ब्रिटनी जॅक्वेसला आपल्या आयुष्यात अनेक ब्रेकअप्सचा सामना करावा लागला होता. याचं सगळ्यात मोठं कारण तिचा लठ्ठपणा हे होतं. ११६ किलो वजनाच्या ब्रिटनीला तिच्या वजनामुळे आणि लठ्ठपणामुळे अनेकांसह ब्रेकअपचा सामना करावा लागला

त्यानंतर मागच्या वर्षी ब्रिटनीच्या आयुष्यात एक फिटनेस ट्रेनर आला. ज्याच्या येण्यानं तिचे संपूर्ण आयुष्य बदलले. ११६ किलो वजन असलेल्या केअर वर्कर ब्रिटनीनं लोकांना सांगितले की, कसं लठ्ठपणामुळे तिला ब्रेकअपचा सामना करावा लागला होता. त्यानंतर फेसबुकच्या माध्यमातून तिला तिचं खरं प्रेम मिळालं. हा नवीन बॉयफ्रेंड फिटनेस ट्रेनर आहे.

या कपल्सची ओळख मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये झाली होती. फेसबूकवर ओळख झालेल्या या नवीन बॉयफ्रेंडचे वजन फक्त ६३ किलो आहे तरीही मॅट हा ब्रिटनीचा आत्मविश्वास पाहून तिच्या प्रेमात पडला.

या कपल्सनं ऑनलाईन आपली लव्हस्टोरी शेअर केली आहे. अनेक लोक त्यांच्या प्रेमाची मस्करी करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पण त्याचे प्रेम खरे असल्याचे जाणीव त्या दोघांनाही आहे.

ब्रिटनी सांगते की, ''जेव्हा मला मॅटने प्रपोज केलं तेव्हा मला विश्वासच होत नव्हता. मला आधी वाटलं की माझ्यासह मस्करी केली जात आहे. पण आता मला माझ्या प्रेमावर पूर्ण विश्वास आहे.''

मॅटच्या म्हणण्यानुसार ब्रिटनीला आपल्या लठ्ठपणाबाबत एक आत्मविश्वास आहे. ती स्वतःच्या आयुष्याबाबत खूप सकारात्मक आहे. 'तीने सगळ्यापेक्षा जास्त आकर्षीत केलं आहे. याआधीही मी अनेक मुलींना डेट केलं आहे. माझी कोणतीच एक्स इतकी पॉझिटिव्ह नव्हती. ' असं मॅट सांगतो.

व्हेलेंटाईन वीकच्या एक दिवस आधीच ६ फ्रेब्रुवारीला मॅटनं ब्रिटनीला प्रपोज केलं. मॅटला स्वतःला खूप खायला आवडतं. तो कधीच ब्रिटनीला वजन कमी करायला सांगणार नाही. असं त्याचे मत आहे.

ब्रिटनीने या रिलेशनशीपबाबत बोलताना सांगितले की, माझ्या मैत्रिणी या रिलेशनशीपवर खूप हसतात. लठ्ठपणामुळे आम्हाला त्रास होईल असं त्यांना वाटतं पण आम्ही आमच्या रिलेशनशीपनं खूप आनंदी आहोत.