Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:18 IST2026-05-19T12:14:01+5:302026-05-19T12:18:19+5:30

Petrol Diesel Hike: चार दिवसात दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली. चार दिवसांत पेट्रोल चार रुपयांनी महागले, त्यामुळे एक मुद्दा आता चर्चेत आला आहे, तो म्हणजे २०२२ च्या दरवाढी फॉर्म्युलाचा!

Petrol Diesel Price Hike: Gradually robbing pockets, 2022 formula to increase petrol-diesel prices? | Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?

Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?

पेट्रोल-डिझेलच्या दरात मंगळवारी (१९ मे) पुन्हा वाढ झाली. चार दिवसांमध्ये कंपन्यांनी दुसऱ्यांदा तेल वाढ केली. त्यामुळे दर चार रुपयांनी वाढले आहेत. याचा थेट फटका सामन्यांच्या बजेटला बसला आहे. कच्चा तेलाचे दर वाढत असून, त्याचा थेट भार तेल कंपन्यांना उचलावा लागू नये म्हणून आणखी इंधन दरवाढ होण्याची शक्यता आहे, ही दरवाढ ९० पैसे फॉर्म्युल्याने केली जाईल का, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

२०२६ या वर्षात २०२२ सालाप्रमाणेच इंधन दरवाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. २०२२ मध्ये सलग १५ दिवस ९० पैशांनी दरवाढ केली गेली होती आणि त्यामुळे इंधनाचे दर प्रचंड वर गेले. दररोज ९० पैशांनी दरवाढ केली गेल्याने कमी वाटत गेली, पण १५ दिवसांत अपेक्षित ती दरवाढ कंपन्यांनी केली होती. 

२०२२ मध्ये काय झालं होतं?

चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०२२ साली युक्रेन-रशिया युद्ध सुरू झालं होतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दराचा भडका उडाला. भारताची तेल भूक ही आयात केलेल्या तेलावरच भागते. त्यामुळे याचा फटका भारताला बसला. तेल कंपन्यांना त्यावेळी नुकसान होऊ लागले होते. मार्च-एप्रिल २०२२ या काळात सलग १५ दिवस तेल वितरक कंपन्यांनी थोडे-थोडे तेल दर वाढवले. १५ दिवसांत १३ वेळा दरवाढ करण्यात आली.   

त्याचप्रमाणे यावेळीही दरवाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. आताही इराण-अमेरिका युद्ध सुरु आहे. त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्यावर झाला आहे. तेल कंपन्यांनी आधी ३ रुपयांनी दरवाढ केली. त्यानंतर आता ९० पैशांनी दरवाढ करण्यात आली आहे. पुढील काळातही तेलाचे दर आणखी वाढणार असल्याचे सूतोवाच दिले गेले आहेत. 

तेल कंपन्यांना दिवसाला १६००-१७०० कोटींचा तोटा

पुढील काही महिने कच्चा तेलाचे दर प्रति बॅरल १०० डॉलरपेक्षा जास्त राहिले तर भारतात चार ते पाच महिने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ बघायला मिळू शकते असे या क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणत आहेत. त्याचे कारण म्हणजे गेल्या काही महिन्यात कच्च्या तेलाचे दर वाढूनही निवडणुका असल्याने पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले गेले. यामुळे तेल कंपन्यांना दररोज १६००-१७०० कोटी रुपये इतके नुकसान सोसावे लागले आणि अजूनही तो फटका बसत आहे. त्यामुळे हळूहळू दरवाढ केल्यानेही कंपन्यांना होणार तोटा बऱ्यापैकी कमी करता येईल शकतो, असे ऊर्जा विषयाचे अभ्यासक धवल पोपट यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले. 

Web Title : पेट्रोल-डीजल की कीमतों में वृद्धि: क्या 2022 का फॉर्मूला फिर से जेब खाली करेगा?

Web Summary : ईंधन की कीमतों में फिर से वृद्धि, 2022 की क्रमिक बढ़ोतरी को दर्शाती है। भू-राजनीतिक तनाव और कच्चे तेल की बढ़ती लागत का हवाला दिया गया है। तेल कंपनियों को दैनिक नुकसान का सामना करना पड़ रहा है, जिससे वित्तीय तनाव को कम करने के लिए कीमतों में और वृद्धि का संकेत मिलता है। विशेषज्ञों को संभावित मूल्य वृद्धि का अनुमान है।

Web Title : Petrol-Diesel Price Hike: Is 2022 Formula Returning to Empty Pockets?

Web Summary : Fuel prices rise again, mirroring 2022's incremental hikes. Geopolitical tensions and rising crude oil costs are cited. Oil companies face daily losses, hinting at further price increases to offset financial strain. Experts foresee potential price surges.