भारीच! एकाच झाडाला लागताहेत दोन भाज्या; बटाट्याच्या झाडाला वांगी अन् वांग्याच्या झाडाला टॉमॅटो

By manali.bagul | Published: February 5, 2021 06:36 PM2021-02-05T18:36:40+5:302021-02-05T18:55:19+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ असलेल्या वाराणसी येथील शहंशाहपुरमध्ये भारतीय पीक संशोधन संस्थानात अनोख्या प्रकारे झाडांची लागवड केली जात आहे. ज्यात एका झाडाला दोन प्रकारच्या भाज्या लागल्या आहेत. ग्राफ्टिंग पद्धतीचा वापर करून बटाटे, वांगी, टॉमॅटो एका झाडात उगवता येऊ शकतात.

ग्राफ्टींग या तंज्ञाच्या मदतीनं एका पेक्षा जास्त पीक एकाच झाडामध्ये घेता येऊ शकतात. या संशोधनाचे प्रमुख आणि संस्थानाचे तज्ज्ञ डॉ. आनंद बहादूर सिंह यांनी सांगितले की, ''ही विशेष झाडं २४ ते ४८ डिग्री तापमानात ८५ टकक्यांपेक्षा जास्त आद्रता आणि प्रकाश नसलेल्या ठिकाणी तयार केली जातात. ग्राफ्टींग केल्यानंतर १५ ते २० दिवसांनी ही पीकं मातीत लावली जातात. योग्य प्रमाणात पाणी घालून देखरेख केली जाते. योग्य देखरेखीनंतर ६० ते ७० दिवसांनी या झाडांना फळं लागतात.

२०१३-१४ ला ग्राफ्टींगचा सगळ्यात पहिला उपयोग करण्यात आला होता. या पद्धतीनं बळीराजाला अधिक फायदा होऊ शकतो. खासकरून अशा ठिकाणी जिथे पावसाच्या दिवसात खूप पाणी साचतं.

सध्या या झाडांना अशा शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलं आहे. जे शहरी भागात राहतात आणि त्यांच्याकडे जागेची कमतरता आहे. तसंच काहीजण बाजारातील रसायनयुक्त पदार्थ खाण्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

हे संशोधन लोकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. जगदिश सिंह यांनी सांगितले की, ''शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचे पीक मिळायला हवे. यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून या शेतीकडे पाहिले जात आहे.

सध्या आम्ही टॉमॅटो, बटाटे, वांगे ही उत्पादनं घेत असून आता प्रगतीच्या दिशेनं वाटचाल सुरू आहे.

येत्या काळात जास्तीत जास्त पीकं घेता येऊ शकतील अशी आशा आहे.''(Image Credit- aajtak)