बोंबला! सुंदर दिसण्यासाठी केला जुगाड पण महिलेचा चेहरा बिघडला, वेदनादायी ट्रिटमेंटसाठी घालवले लाखों रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 03:27 PM2020-10-15T15:27:49+5:302020-10-15T15:35:29+5:30

अनस्तास्याने आपल्या ओठांवर आणि तोंडावर फिलर्स टाकले आहे. या चेहऱ्यामुळे तिचे इन्स्टाग्रामवर २ लाख २० हजार फॉलोअर्स आहे. ती नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.

जगभरात वेगवेगळ्या प्रकारचे सनकी किंवा विचित्रपणा करणारे लोक असतात. काही महिला सुंदरतेसाठी कोणत्याही सीमा पार करतात. पण असं करत असताना अनेकजण आपलं स्वत:चं नुकसान करून घेतात. त्यांचं कौतुक होण्याऐवजी खिल्ली उडवली जाते. अशाच एका मॉडलची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या महिलेचे गाल वेगळेच आहे. तिचा चेहरा बेढब झाला आहे. असं असलं तरी या महिलेच्या नावावर एक रेकॉर्ड नोंदवला गेलाय. हा रेकॉर्ड आहे जगातली सर्वात मोठे गाल असलेली महिला. महिलेनुसार, तिचे गाल अजून लहानच आहेत. तिला ते आणखी मोठे करायचे आहेत.

ही आहे जगातली सर्वात मोठे गालवाली इन्स्टाग्राम स्टार. या महिलेचं नाव आहे अनस्तास्या पोकरिकश्र्चुक. ती गेल्या काही वर्षांपासून तिच्या गालांवर फिलर्स टाकत आहे.

या महिलेचे गाल आता इतके मोठे झाले आहे की, तिने गालांमध्ये छोटे बॉल्ट टाकलेत. पण ३९९ वर्षीय ही महिला अजूनही तिच्या गालावर खूश नाहीये. तिला अजूनही मोठे गाल हवे आहेत.

या महिलेने लोकांसोबत शेअऱ केलं की, भलेही लोकांना वाटतं की तिचे गाल मोठे आहेत. पण ती तिच्या गालांवर खूश नाही. तिला अजून मोठे गाल हवे आहेत.

यूक्रेनमध्ये राहणाऱ्या या महिलेने सर्वात पहिल्यांदा ती २६ वर्षांची असताना गालांवर फिलर्स टाकले होते. याच्या चार वर्षांनंतर तिने अनेकदा असंच केलं.

तिने सांगितले की, पहिल्यांदा गालांवर फिलर्स टाकल्यावर ती फार आनंदी झाली होती. त्यानंतर तिने फिलर्स टाकणे बंद केले.

आता ही महिला गालांमध्ये इंजेक्शन घेते. लोकांना वाटतं या महिलेचा चेहरा विचित्र आहे. पण याने तिला काहीही फरक पडत नाही.

अनस्तास्याने आपल्या ओठांवर आणि तोंडावर फिलर्स टाकले आहे. या चेहऱ्यामुळे तिचे इन्स्टाग्रामवर २ लाख २० हजार फॉलोअर्स आहे. ती नेहमी तिचे फोटो शेअर करत असते.