'हा' आहे नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा सगळ्यात मोठा विक पॉईंट; दिसताच करतात असं काही.....

By manali.bagul | Published: January 24, 2021 02:18 PM2021-01-24T14:18:30+5:302021-01-24T15:49:28+5:30

असं म्हणतात माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्यात लपलेलं बालपण कधीही जात नाही. २० जानेवारीला जगातील सगळ्यात शक्तीशाली नेता ज्यो बायडन यांनी अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. जरी त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली असली तरी त्यांच्यातील लहान मुलं अजूनही तसंच आहे.

अनेकदा त्यांच्यातील हे लहानपण लोकांना दिसून येतं, खासकरून जेव्हा आईस्क्रिम खायची वेळ येते. होय, ज्यो बायडन यांना आईस्क्रीम खायला खूप आवडतं. जेव्हाही त्यांची नजर आईस्क्रिमवर पडते तेव्हा त्यांच्यातील लहान मुलं जागं होतं. बायडन यांचे काही खास फोटो आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. हे फोटो पाहून बायडन यांना आईस्क्रिम किती आवडतं हे तुम्हाला नक्की कळेल.

ज्यो बायडन यांचे आईस्क्रिम प्रेम कोणापासूनही लपलेले नाही. त्यांना जेव्हाही संधी मिळते तेव्हा ते आईस्क्रिमचा आस्वाद घेतात.

मे २०१६ मध्ये बायडन यांनी एका आईस्क्रिमच्या प्रमोशन दरम्यान सांगितले होते की, ''माझं नाव बायडन मला आईस्क्रिम प्रचंड आवडत असून माझे आईस्क्रिमवर प्रेम आहे. सगळ्यांना वाटतं की मी मस्करी करतो. पण हे खरं आहे. ''

बायडन एकावेळी तीन-चार आईस्क्रीम खाऊ शकतात. त्यांना जेनी चेनचे आईस्क्रीम्स खूप आवडतात.

चोको चिप्स हा त्यांचा आवडता आईस्क्रीम फ्लेवर आहे. बायडन जास्तीत जास्त या फ्लेवरचे आईस्क्रीम्स मागवतात.

ते जेव्हाही आईस्क्रिम मागवतात तेव्हा डबल स्कूप वॅफल कोनला प्राधान्य देतात. अनेकदा त्यांना ही आईस्क्रीम खाताना लोकांनी पाहिले आहे.

२०१० मध्ये त्यांनी सांगितले होते की, ''मी ना दारू पीतो , ना सिगारेट पण मला आईस्क्रीमचे खूप वेड आहे.''हा त्यांचा सगळ्यात मोठा विक पॉईंट आहे.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता हातात आईस्क्रीम घेतल्यानंतर बायडन एखाद्या लहान मुलाप्रमाणे खूश होत आहे

संधी मिळाल्यानंतर बायडन एकदाही आईस्क्रिम खायला विसरत नाहीत. (Image Credit-Financial Times, ABC, asianetnews)

Read in English