राफेलवरून गोव्यात राडा; भाजप-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 07:03 PM2018-12-21T19:03:31+5:302018-12-21T19:08:11+5:30

राफेलच्या विषयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने केली.

पाहता-पाहता दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले.

यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

भररस्त्यातच हा प्रकार सुरू झाल्याने पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली.