काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 15:16 IST2025-04-26T14:57:03+5:302025-04-26T15:16:11+5:30

कारमध्ये पाण्यासाठी बाटल्या नेहमी ठेवलेल्या असतात, पण ही सवय तुमच्या तोट्याची ठरु शकते. कारमध्ये ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीमुळेही आग लागू शकते.

आपल्याकडे कारमध्ये पाण्याच्या बाटल्या अनेकजण ठेवतात. पण, याच बाटलीमुळे तुमच्या कारला आग लागू शकते. हे वाचून तुम्हाला पटणार नाही. पण बाटलीमुळे आग लागू शकते. हे समोर आले आहे.

प्रत्यक्षात कारमध्ये ठेवलेली पाण्याची बाटली एका लेन्ससारखी काम करते आणि सूर्याच्या किरणांना केंद्रित करू शकते, यामुळे ज्वलनशील पदार्थांना आग लागू शकते.

लेन्स इफेक्ट - जर पाण्याची बाटली पारदर्शक प्लास्टिकची बनलेली असेल आणि ती स्वच्छ पाण्याने भरलेली असेल, तर ती सूर्याच्या किरणांना केंद्रित करू शकते.

भिंग ज्या प्रकारे काम करते तसे ती करते. ज्यावेळी हे केंद्रित बीम कार सीट कापड, कागद, प्लास्टिक इत्यादी कोणत्याही ज्वलनशील पदार्थावर पडते तेव्हा तेथील तापमान इतके वाढू शकते की त्यामुळे आग लागू शकते.

आता अशा घटना कशा टाळता येतील हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या घटनांपासून वाचणे खूप सोपे आहे.

पारदर्शक पाण्याची बाटली थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. बाटली कापडाने किंवा वर्तमानपत्राने झाकून ठेवा.

कारमधील सीटवर किंवा डॅशबोर्डवर बाटली ठेवण्याऐवजी, ती थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणार नाही अशा ठिकाणी दाराच्या होल्डरमध्ये ठेवा.

तुमची कार उन्हाऐवजी सावलीत पार्क करण्याचा प्रयत्न करा. ओपन पार्किंगपेक्षा बंदीस्त पार्किंग तुमच्या कारसाठी चांगले आहे.

टॅग्स :कारआगcarfire