पोलिसांनी उचललेली दुचाकी सोडवून घेण्यासाठी एका वृद्धाने भलताच पवित्रा घेतला. ते चक्क वाहन उचलणाऱ्या पोलिसांच्या ट्रकसमोरच झोपले. आधी दुचाकी द्या नंतरच येथून जा, असा त्यांनी पवित्रा घेतला. त्यांचा तो आक्रमकपणा पाहून पोलीस वरमले अन् त्यांनी दुचाकी वाहन ...
उपराजधानीला अपघातमुक्त शहर बनविण्याची पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची संकल्पना आहे. ती पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया वाहतूक शाखेचे नवनियुक्त पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली. ...
शहरातील विजेचे थकीत बिल वाढून १०८.४४ कोटी रुपयांवर पोहोचल्याने चिंतेत असलेल्या महावितरणने थकबाकी वसुलीची गती वाढवली आहे. या वर्षातील दोन महिन्यात ४,३०० थकबाकीदारांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आहे. ...
डोळे असो वा नसो, दृष्टी असली पाहिजे, स्वत:वर विश्वास असला पाहिजे आणि नवे जग धुंडाळण्याची ऊर्मी असली पाहिजे. या सगळ्याचा संगम झाला आणि नेत्रबाधित २० विद्यार्थ्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल १३ किल्ल्यांचे दर्शन घेऊन ‘हम भी कुछ कम नहीं’चा नारा दिला. ...
आदिवासी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मुकेश नेताम यांनी एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी डीगांबर चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. प्रकल्प अधिकाऱ्यांनी विद्यार्थी व महाविद्यालय प्रशासनात समन्वय साधून विद्यार्थ्यांना त्यांचा हक्काचा निधी मिळवू ...
प्रशासकीय सेवेत असतांना संवेदनशील राहून कसे काम करता येते, याची शिकवण देणारे हे पुस्तक सत्ता-संवेदना खऱ्या अर्थाने महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी वर्गासाठी एक हॅण्डबुक ठरेल, असा विश्वास सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर य ...
मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण आता खूप झाले. यापुढे मुस्लिम समाजाला शैक्षणिकच काय तर कुठलेही आरक्षण मिळू देणार नाही. वेळ पडली तर रस्त्यावर उतरू, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त राष्ट्रीय महामंत्री सुरेंद्र जैन यांनी येथे दिला. ...
राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. निसर्गानेही यंदा योग्य साथ दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरतील अशा कृषी वानिका योजना राबवा, असे आवाहन वन राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. ...
आपल्या देशाला पाकिस्तानचा धोका मुळीच नाही. बालाकोट एअर स्ट्राईकने पाकडे चित झाले आहेत. खरा धोका या देशातील हिंदूंच्या आत्मघातकी वृत्तीचा आहे. याची जाणीव स्वातंत्र्यवीरांनी खूप आधीच करवून दिली आहे, त्याचे स्मरण करण्याचे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष ...