आरोग्याच्या हितासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत असले, तरी सावली येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका मागील काही दिवसांपासून बंद असल्याने रूग्णांना दुसरीकडे हलविताना कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामीण रुग्णालय ...
बल्लारशाह रेल्वे स्थानकावर ५ फलाट आणि यार्ड पकडून १२ रेल्वेलाईन आहेत. दिल्लीकडील गाड्या फलाट क्रमांक एकवर आणि तेलंगणा, तामिळनाडूकडून दिल्लीकडे जाणाऱ्या सुपरफास्ट गाड्या फलाट क्रमांक तीन व चारवर थांबविण्याचे वेळापत्रक आहे. या वेळापत्रकानुसारच प्रवासी ...
नागभीड हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे विविध कामाच्या निमित्ताने येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठया प्रमाणावर आहे. याशिवाय या ठिकाणी तीन महाविद्यालये, तीन कनिष्ठ महाविद्यालये, तीन माध्यमिक विद्यालये, तीन प्राथमिक शाळा, तीन - चार कॉन्व्हेंट आहेत. या ...
आय.आय.सी. टेक्नॉलॉजी हैद्राबाद यांच्या फॅक्स संदेशान्वये चिमूर तालुक्यातील हरणी, खुटाळा, खांबाला या परिसरातून २६ फेब्रुवारी २०२० ते ०४ मार्च २०२० या कालावधीत विशेष विमानाच्या सहाय्याने हवाई सर्व्हे होणार आहे. सदर हवाई सर्व्हेदरम्यान कमी उंचीवरील हवाई ...
चंद्रपूर जिल्ह्यात वनसंपदेसोबतच खनिज संपदाही विपूल आहे. त्यामुळे उद्योजकांनी चंद्रपूर जिल्ह्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. मात्र वनसंपदेकडे दुर्लक्ष करीत केवळ खनिज संपदेकडे सर्वांनी लक्ष केंद्रित केले. त्यामुळे जंगलाचा झपाट्याने ऱ्हास झाला. आतातर उद्य ...
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा) अंतर्गत कडक कारवाई करण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाने पूर्ण केले. यासाठी पोलीस पथकाला विशेष प्रशिक्षण देण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक ...
आलेवाही हे नागभीड तालुक्यातील शेवटचे गाव असून अतिशय दुर्गम भागात आहे. गावाची लोकसंख्या ५०० च्या आसपास आहे. गावाभोवती घनदाट जंगल आहे. सतत फ्लोराईडयुक्त पाणी प्यायल्याने या गावातील लोकांना विविध आजार जडले आहेत. म्हणूनच शासनानेही या गावाची फ्लोराईडयुक्त ...
शासनाच्या पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजने अंतर्गत स्वयंपाकासाठी गॅसची सोय उपलब्ध केली आहे. परंतु येथील नागरिक दगडी कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक करीत असतात. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या वेळी सास्ती गावात कोळशाच्या शेगडीमुळे धुळ व धूर पसरलेली असते. या धुराम ...
या रोगाचा प्रसार क्यूलेक्स डासाच्या मादीपासून होतो. डासाची मादी हत्तीरोगग्रस्त रोग्यास चावते. ती आपल्या सोंडेने शरीरातील रोगगंतु ओढून घेते. या रोगजंतुची वाढ डासाच्या शरीरात १०-१४ दिवसात होते. वाढ पूर्ण झाल्यावर ती मादी निरोगी माणसाला चावते. डास चावल् ...
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने सायकल चालकांसाठी हा उपक्रम सुरू केला आहे. बंगाली कॅम्प व श्री टॉकीज चौक येथे या मोहिमेचा शभारंभ सकाळी ८ वाजता करण्यात आला. स्थानिक बंगाली कॅम्प ...