ध्रूम्रपान करणाऱ्यांवरही होणार कडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:00 AM2020-02-23T06:00:00+5:302020-02-23T06:00:40+5:30

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा) अंतर्गत कडक कारवाई करण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाने पूर्ण केले. यासाठी पोलीस पथकाला विशेष प्रशिक्षण देण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेखर देशमुख (गृह ) उपधीक्षक, पोलीस सारथी सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. टी. एकुरके .....

Smokers will also take stern action | ध्रूम्रपान करणाऱ्यांवरही होणार कडक कारवाई

ध्रूम्रपान करणाऱ्यांवरही होणार कडक कारवाई

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । पोलीस प्रशासन, कोटपा कायद्याबाबत कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सर्रास होणारे धूम्रपान आणि तंबाखू खर्रा सेवनाचे वाढते व्यसन आरोग्याला घातक आहे. त्यामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली आता तंबाखुविरोधी कोटपा कायद्यानुसार कडक कारवाईची मोहीम सुरू केले जाणार आहे. संबंध हेल्थ फाऊंडेशन आणि चंद्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनच्या माध्यमातुन यासाठी नुकतेच प्रशिक्षण व कृती कार्यक्रम आखण्यात आले.
सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा (कोटपा) अंतर्गत कडक कारवाई करण्याचे नियोजन पोलीस प्रशासनाने पूर्ण केले. यासाठी पोलीस पथकाला विशेष प्रशिक्षण देण्यात आले. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शेखर देशमुख (गृह ) उपधीक्षक, पोलीस सारथी सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. टी. एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध हेल्थ फाऊंडेशन आणि चंद्र्रपूर कॅन्सर केअर फाऊंडेशनतर्फे कोटपा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. कर्करोग तज्ज्ञ डॉ. प्रणव इंगोले यांनी तंबाखूमुळे होणाºया आजाराबत आणि त्याच्या परिणामाबाबत शास्त्रीय माहिती दिली.

कोटपा-२००३ कायदा म्हणजे काय ?
सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा अधिनियम २००३ हा केंद्र सरकरचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी कलम-४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. कलम- ६ (ब ) नुसार कोणत्याही शैक्षणिक संन्स्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. बाल न्याय कायदा कलम-७७ नुसार बालकांना किंवा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्यास १ लाख व आणि ७ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे
सार्वजनिक धूम्रपान व शाळा- कॉलेजजवळ तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाºयांवर येत्या काही दिवसांत धडक कारवाई केली जाणार आहे. शाळा व महाविद्यालयात शिकणारी मुले व्यसनांच्या विळख्यात अडकू नये, यासाठी शिक्षक, पालक, सामाजिक संघटना, महिला बचतगट क्रीडा मंडळे आदींनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Smokers will also take stern action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस