चिमूर परिसरात नागरिकांना जवळून होणार विमानाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 06:00 AM2020-02-24T06:00:00+5:302020-02-24T06:00:45+5:30

आय.आय.सी. टेक्नॉलॉजी हैद्राबाद यांच्या फॅक्स संदेशान्वये चिमूर तालुक्यातील हरणी, खुटाळा, खांबाला या परिसरातून २६ फेब्रुवारी २०२० ते ०४ मार्च २०२० या कालावधीत विशेष विमानाच्या सहाय्याने हवाई सर्व्हे होणार आहे. सदर हवाई सर्व्हेदरम्यान कमी उंचीवरील हवाई उड्डाने (जमिनीपासुन २५० फुट) उंचीवर होणार आहेत.

The aircraft will be seen near Chimur area | चिमूर परिसरात नागरिकांना जवळून होणार विमानाचे दर्शन

चिमूर परिसरात नागरिकांना जवळून होणार विमानाचे दर्शन

googlenewsNext
ठळक मुद्दे२६ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत हवाई सर्व्हे होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : दळणवळनाचे तीन मार्ग भूपृष्ठ, जल व हवाई यामधील हवाई वाहतूक ही सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेरच असते. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला विमानाचे आजही कुतुहलच. मात्र एका सर्वेक्षणासाठी चिमूर तालुक्यातील खांबाला, हरणी व खुटाळा या गावातील परिसरातून जमिनीपासून २५० फुटावरून विमान घिरटया घालणार आहे. त्यामुळे चिमूर तालुक्यातील या गावांना जवळून विमानाचे दर्शन होणार आहे.
आय.आय.सी. टेक्नॉलॉजी हैद्राबाद यांच्या फॅक्स संदेशान्वये चिमूर तालुक्यातील हरणी, खुटाळा, खांबाला या परिसरातून २६ फेब्रुवारी २०२० ते ०४ मार्च २०२० या कालावधीत विशेष विमानाच्या सहाय्याने हवाई सर्व्हे होणार आहे. सदर हवाई सर्व्हेदरम्यान कमी उंचीवरील हवाई उड्डाने (जमिनीपासुन २५० फुट) उंचीवर होणार आहेत.
त्यादृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे, प्रभारी अधिकारी यांनी हवाई सर्वे कालावधीत कमी उंचीवरील हवाई उड्डाने व अन्य इतर कारणावरुन आपले कार्यक्षेत्रातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही , याबाबत दक्षता व सतर्कता बाळगण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.
हा हवाई सर्व्हे कशासाठी आहे, हे माहीत नसले तरी चिमूर तालुक्यातील नागरिकांच्या कानात विमानाचा आवाज एक आठवडा गुंजणार असून २५० फुटावरून विमान बघण्याचा आनंदही घेता येणार आहे.
या कालावधीत हवाई सर्व्हेदरम्यान विमान गोंदिया, नागपूर जिल्ह्यातील काही गावावरून व छत्तीसगड राज्यातील काही गावांवरूनही विमान घीरट्या घालणार आहे.

Web Title: The aircraft will be seen near Chimur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.