बंद रुग्णवाहिकेमुळे सावलीत रुग्णांची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 05:00 IST2020-02-25T05:00:00+5:302020-02-25T05:00:39+5:30

आरोग्याच्या हितासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत असले, तरी सावली येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका मागील काही दिवसांपासून बंद असल्याने रूग्णांना दुसरीकडे हलविताना कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामीण रुग्णालय असल्याने परिसरातील बहुतांश रुग्ण उपचाराकरिता येतात. त्यांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली होती.

The shaking of the patient in the shadow due to a closed ambulance | बंद रुग्णवाहिकेमुळे सावलीत रुग्णांची हेळसांड

बंद रुग्णवाहिकेमुळे सावलीत रुग्णांची हेळसांड

ठळक मुद्देआरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष : रुग्णांना आर्थिक भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
सावली : सावली हे तालुक्याचे मुख्यालय असून या ठिकाणी एकमेव ग्रामीण रुग्णालय आहे. परिसरातील नागरिकांना आरोग्याची सोय उपलब्ध व्हावी या हेतूने ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. आरोग्याच्या हितासाठी शासन लाखो रुपये खर्च करीत असले, तरी सावली येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णवाहिका मागील काही दिवसांपासून बंद असल्याने रूग्णांना दुसरीकडे हलविताना कुटुंबियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामीण रुग्णालय असल्याने परिसरातील बहुतांश रुग्ण उपचाराकरिता येतात. त्यांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली होती.
दीड वर्षांपूर्वी वरोरा येथील ग्रामीण रुग्णालयातील जुनी रुग्णवाहिका या रुग्णालयाला देण्यात आली. रुग्णवाहिका उपलब्ध झाली तेव्हापासून अनेकदा बिघाड आला आणि दुरुस्तीकरिता पंधरा-पंधरा दिवसाचा कालावधी लागत आहे. दरम्यान, अतिगंभीर रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करताना रुग्णवाहिकेसाठी भटकावे लागत असल्याचे वास्तव आहे. रुग्णाला तात्काळ सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका ही अत्यावश्यक बाब असली तरी या रुग्णालयातील रुग्णवाहिका नेहमीच नादुरुस्त राहत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नाईलाजाने खाजगी रुग्णवाहिकेचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन ही समस्या निकाली काढावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

रुग्णवाहिका दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली आहे. लवकर दुरुस्त करून देण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. दोन-तीन दिवसात या रूग्णालयाला रुग्णवाहिका उपलब्ध होईल.
- डॉ.यमु मडावी,
वैद्यकीय अधीक्षक
ग्रामीण रुग्णालय. सावली.

आरोग्य सेवा ही अतिआवश्यक सेवा आहे. रुग्णवाहिका नादुरुस्त असणे ही गंभीर बाब असून परिसरातील नागरिकांना तात्काळ आरोग्यसेवा मिळण्याकरिता या रुग्णालयात अद्यावत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी.
- विजय कोरेवार, सभापती पंचायत समिती सावली

सावलीच्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेची अत्यंत आवश्यकता आहे. आरोग्य प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. येत्या आठ दिवसात नवीन रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- रोशन बोरकर, शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, सावली

Web Title: The shaking of the patient in the shadow due to a closed ambulance