मालगाड्या थांबतात प्रवाशी रेल्वे फलाटावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 06:00 AM2020-02-24T06:00:00+5:302020-02-24T06:00:50+5:30

बल्लारशाह रेल्वे स्थानकावर ५ फलाट आणि यार्ड पकडून १२ रेल्वेलाईन आहेत. दिल्लीकडील गाड्या फलाट क्रमांक एकवर आणि तेलंगणा, तामिळनाडूकडून दिल्लीकडे जाणाऱ्या सुपरफास्ट गाड्या फलाट क्रमांक तीन व चारवर थांबविण्याचे वेळापत्रक आहे. या वेळापत्रकानुसारच प्रवासी गाडी पकडण्यासाठी फलाटावर जातात.

Trains stop at the passenger train freight | मालगाड्या थांबतात प्रवाशी रेल्वे फलाटावर

मालगाड्या थांबतात प्रवाशी रेल्वे फलाटावर

Next
ठळक मुद्देबल्लारपूर रेल्वेस्थानक : गाडी आल्यास प्रवाशांची धावपळ

मंगल जीवने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : मध्य रेल्वेचे शेवटचे प्रवेशद्वार म्हणून बल्लारशाह रेल्वेस्थानक प्रसिद्ध आहे. या स्थानकावरून दरदिवशी ३८ सुपरफास्ट गाड्या धावतात. परंतु काही महिन्यापासून नियोजित फलाटाऐवजी दुसऱ्याच फलाटावर येत असल्यामुळे गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ होते. शनिवारी तेलंगणा व राजधानी सुपरफास्ट गाडी नियोजित फलाटावर न येत दुसºयाच फलाटावर आल्याने मोठी त्रेधातिरपीट उडाली होती.
बल्लारशाह रेल्वे स्थानकावर ५ फलाट आणि यार्ड पकडून १२ रेल्वेलाईन आहेत. दिल्लीकडील गाड्या फलाट क्रमांक एकवर आणि तेलंगणा, तामिळनाडूकडून दिल्लीकडे जाणाऱ्या सुपरफास्ट गाड्या फलाट क्रमांक तीन व चारवर थांबविण्याचे वेळापत्रक आहे. या वेळापत्रकानुसारच प्रवासी गाडी पकडण्यासाठी फलाटावर जातात. परंतु फलाटावर गेल्यावर अमुक गाडी या फलाटावर येत नसून दुसऱ्या फलाटावर येत आहे, अचानक घोषणा केली जाते. त्यामुळे गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू होते. या धावपळीत ज्येष्ठ नागरिक सोबत असेल तर पूल चढून खाली फलाटावर येतपर्यंत गाडी सुटते. या रेल्वेस्थानकावर केवळ पाच मिनीटांचा थांबा आहे. प्रवाशांसोबत दिव्यांग व्यक्ती असल्यास हाल होतात. या समस्येबाबत रेल्वे अधिकारी उत्तर द्यायला तयार नाहीत. ५ फलाटावर १४ खानपान वस्तू विकणाऱ्यांचे स्टॉल आहेत. लाखो रुपये खर्चून हे स्टॉल घेण्यात आले. परंतु नियोजित फलाटावर गाडी थांबत नसल्याने व्यवसायच होत नाही, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

रेल्वेच्या प्रतीक्षेत होते पुलावर गर्दी
रेल्वेगाड्या कुठल्या फलाटावर येणार, याचा बऱ्याच प्रवाशांना अंदाज आला. त्यामुळे सरळ फलाटावर न जात प्रवाशी पुलावरच उभे राहतात. गाडी येणार असल्याची उद्घोषणा झाल्यानंतर फलाटावर उतरतात. त्यामुळे घसरून पडण्याचा धोका आहे.

प्रवाशी म्हणतात...
रेल्वे प्रशासन मालवाहू गाड्यांकडे विशेष लक्ष आहे. परंतु, रेल्वेस्थानकावरील ५ पैकी एकातरी फलाटावर मालगाडी हमखासपणे उभी राहते. या मालगाड्या दोन ते तीन तास फलाटावरच उभ्या राहत असल्याने सुपरफास्ट गाडी दुसऱ्या फलाटावर थांबविल्या जाते. हा प्रकार बºयाच दिवसांपासून सुरू आहे. मालगाड्या यार्डमध्ये का लाावल्या जात नाही. तासनतास या गाड्या नेमके प्रवाशी फलाटावर उभे ठेवण्याचे कारण काय, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.

Web Title: Trains stop at the passenger train freight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे