रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 06:23 IST2026-05-01T06:22:53+5:302026-05-01T06:23:27+5:30
विदर्भातील सर्व शहरांचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वरच आहे. उर्वरित राज्यात पारा ३५ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान आहे.

रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
मुंबई - राज्यात आता रात्रीचा गारवा कमी होऊन उकाडा वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने गुरुवारी वर्तवला. राज्याला उष्णतेचा दुहेरी ताप सोसावा, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले.
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले, की हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांसाठी तापमान आणि पावसाबाबतचा विस्तारित अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, रात्रीच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
उष्णतेच्या लाटेची तीव्रता किंचित कमी
राज्यभरातील उष्णतेच्या लाटेची तीव्रता काहीशी कमी झाली असली तरी विदर्भातील सर्व शहरांचे कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वरच आहे. उर्वरित राज्यात पारा ३५ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान आहे.
चंद्रपूर सर्वाधिक उष्ण
राज्यात गुरुवारी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद चंद्रपूर येथे ४४.६ अंश सेल्सिअस झाली.