Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार

तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार

नीचांकी पातळी : प्रथमच डॉलरचा भाव गेला ९५ रुपयांवर, युद्धाचा वणवा पेटण्याच्या शक्यतेने सुरू झाली पडझड, पेट्रोल-डिझेलचाही उडू शकतो भडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 07:24 IST2026-05-01T07:22:24+5:302026-05-01T07:24:52+5:30

नीचांकी पातळी : प्रथमच डॉलरचा भाव गेला ९५ रुपयांवर, युद्धाचा वणवा पेटण्याच्या शक्यतेने सुरू झाली पडझड, पेट्रोल-डिझेलचाही उडू शकतो भडका

Rupee hits record low as oil prices rise! Inflation crisis hits common man; Essential commodities will become more expensive | तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार

तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार

नवी दिल्ली / मुंबई : युद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता आणि कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १२६ डॉलरपर्यंत वाढल्याने डॉलर्सच्या तुलनेत भारतीय रुपयाची अक्षरशः वाताहत झाली आहे. गुरुवारी सकाळच्या सत्रात रुपया तब्बल ३२ पैशांनी कोसळत ९५.३४ या आतापर्यंतच्या सर्वांत नीचांकी स्तरावर पोहोचला. यामुळे भारताला आयातीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार असून, महागाईचा भडका उडण्याची भीती वाढली आहे.

दिवसअखेर रुपया ९४.८४ वर बंद झाला. मात्र, रुपयाचे आणखी अवमूलन होणार असल्याची भीती तज्ञांनी वर्तविली आहे. आरबीआयने हस्तक्षेप करूनही रुपया सावरत नसल्याचे चित्र असून, त्यामुळे येत्या काळात महागाईचे चटके सामान्यांना बसू शकतात.

रुपया घसरणीची कारणे?
'ब्रेंट क्रुड' प्रति बॅरल १२६ डॉलरच्या पार गेले. हे तेल भारत आयात करतो.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात करण्यास नकार दिला.
२ महिन्यांत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून सुमारे २० अब्ज डॉलर काढून घेतले आहेत.
रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयचे  प्रयत्न तोकडे पडत आहेत. 

१२६.४१ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले तेल
गुरुवारी जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतींचा स्फोट झाला. कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल १२६.४१ डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. २००८ च्या जागतिक मंदीनंतर तेलाचा हा सर्वोच्च दर आहे. 

सेन्सेक्स ५८३ अंकांनी कोसळला
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ५८३ अंकांनी घसरून ७६,९१३ वर स्थिरावला, तर 'निफ्टी' १८० अंकांच्या घसरणीसह २३,९९७ वर बंद झाला. बाजार उघडताच विक्रीचा प्रचंड मारा झाला. एका क्षणी सेन्सेक्स १२३७ अंकांनी कोसळला होता, ज्यामुळे बाजार ७६,२५८ च्या पातळीवर गेला होता.

खिशाला बसणार झळ
आयात खर्च वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता.
परदेशातून येणारे मोबाइल, लॅपटॉप आणि सुटे भाग महाग होतील.
परदेशी शिक्षणाच्या खर्चात १० ते १५ टक्क्यांनी वाढ होईल.

सोने २ हजारांनी महागले, चांदी झाली स्वस्त
जागतिक बाजारपेठेतील घडामोडीने  सोन्याच्या दराने पुन्हा उसळी घेतली. दिल्लीत सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम २,००० रुपयांची वाढ झाली असून, दर १,५४,८०० रुपयांवर पोहोचला आहे. तर औद्योगिक मागणीतील बदल आणि जागतिक संकेतांमुळे चांदीच्या दरात  प्रति किलो १,८०० रुपयांची घसरण  होत ती २,४२,७०० रुपये प्रति किलोवर आली आहे.
 

Web Title : तेल की कीमतों में वृद्धि के बीच रुपया गिरा, महंगाई बढ़ने की आशंका

Web Summary : तेल की बढ़ती कीमतों और वैश्विक अनिश्चितता के कारण रुपये ने रिकॉर्ड निचला स्तर छुआ। इस गिरावट से आयात लागत बढ़ेगी, जिससे महंगाई बढ़ेगी। शेयर बाजार भी गिर गया, जो अर्थव्यवस्था की भविष्य की स्थिरता के बारे में निवेशकों की चिंताओं को दर्शाता है।

Web Title : Rupee Plummets Amid Rising Oil Prices, Inflation Fears Soar

Web Summary : The rupee hit a record low due to soaring oil prices and global uncertainty. This depreciation will increase import costs, fueling inflation. Stock markets also plunged, reflecting investor concerns about the economy's future stability.