आगाराअंतर्गत असणार्या अनेक बस खटारा झाल्यामुळे झाल्यामुळे प्रवासी या आगारातून सुटणार्या बस गाड्यांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. ...
दहा वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने ग्रामीण कारागिरांना दिलेली कर्जमाफी अद्यापही लाभार्थ्यांना मिळाली नाही. सरकारने कर्जमाफी करतेवेळी दिलेला व्याजदर आणि बँकेने प्रत्यक्षात लावलेल्या व्याजदरात तफावत असल्याने पेच निर्माण झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ...
नैतिक मूल्ये केवळ शिक्षणातून नाही तर संपूर्ण समाजातून गायब होत आहे. पुस्तकातील शिक्षण आणि समाजातील वास्तव यातील तफावत जेव्हा विद्यार्थ्याला दिसते तेव्हा त्याला नैतिक मूल्ये कशी देणार? ही विसंगती बाजूला सारून सुसंगती साधण्याची आज गरज आहे, असा विचार म ...
स्वत:ची अंगठी मोडून व भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्ज स्वरूपात घेऊन शाळा ई-लर्निंग करणार्या देठेवाडी येथील शिक्षक रवींद्र गायकवाड यांचा सत्कार २ अंगठ्या देऊन करण्यात आला. हा विशेष सत्कार हे या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आकर्षण ठरले. ...
‘घेऊ नको रे फाशी ,जग राहिल उपाशी’ ही घोषणा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निघालेल्या जागर दिंडीतील प्रमुख घोषणा ठरली. विद्यार्थी व युवकांनी या घोषणेने शहर दणाणून सोडले. ...
कोणत्याही समारंभात हारतुर्यांना फाटा देत ग्रंथभेट दिली तर खर्या अर्थाने ग्रंथ वाचनाची चळवळ गतिमान होईल. असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेश धस यांनी केले. ...
साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कविसंमेलनात कवी मंडळींनी विविध विषयांवर आशयघन कविता सादर करीत रसिकांची दाद मिळविली. दुसरीकडे स्वतंत्र निर्माण केलेल्या व्यासपीठावर शिक्षक कवींनी शेतकर्यांच्या व्यथा-वेदनांंना आपल्या काव्यातून वाट मोकळी करून दिली. ...
ग्रामीण भागातील चित्र डोळ्यासमोर उभे करून विविध व्यक्तिरेखा आपल्या दमदार कथेतून सादर करणार्या शिक्षक कथाकारांनी शैला लोहिया व्यासपीठावरून रसिकांची मने जिंकली. ...
अंबाजोगाई - लातूर रोडवरील साखर कारखाना नजीक असलेल्या हॉटेलसमोर रविवारी रात्री झालेल्या इनोव्हा कारच्या भीषण अपघातात शाम बिडगर या युवकाचा जागेवरच मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले. ...