सदर ग्रामसेवकाची बदनामी करण्यात आली. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेने केली. संबंधित ग्रामसेवकाचे मानसिक खच्चीकरण होत आहे. तेथे थेट जनतेतून अनुसूचित जमाती प्रवर्गातील सरपंच निवडून आले. ग्रामपंचायत सदस्य ...
नदी, नाले कोरडे पडले आहे. विहिरींची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावांना पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहे. तूर्तास २३ गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे या गावांतील ग्रामपंचायतींनी टंचाईवर मात करण्यासाठी गावाशेजारी पाणी अस ...
चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा चाकूचे सपासप वार करून निर्घृण खून केला व नंतर स्वत:ही झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही थरारक घटना जिल्ह्याच्या पांढरकवडा पोलीस ठाण्यांतर्गत बोथबहात्तर गावात शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. ...
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात ४५ अॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांसह एकूण 65 जण भरती आहेत. यात 20 प्रिझमटिव्ह केसेस असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. ...
काळविटाची शिकार करुन मांसविक्री करणाऱ्या एकास यवतमाळ जिल्ह्यात अटक करण्यात आली. त्याच्याजवळून मांस, तराजू, गंज, दुचाकी आदी मुद्देमाल जप्त करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ११ वाजता रेणुकापूर वनक्षेत्रात करण्यात आली. ...
लॉकडाऊन काळात दारू विक्री केली जात असल्याच्या संशयावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारव्हा रोडवरील पाच बीअरबार आणि एका बीअर शॉपीची तपासणी केली. तेव्हा तेथील दारू साठ्यात तफावत आढळून आली. त्यामुळे कारवाईसाठी या तपासणीचा अहवाल गुरूवारी जिल्हाधिकाऱ्या ...
लॉकडाऊनमुळे सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बसत आहे. बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असल्याने शेतमालाची खरेदी-विक्रीच रखडली आहे. यवतमाळातील पणनच्या कापूस खरेदी केंद्रावर गुरुवारी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली. ...
यवतमाळ तालुक्यातील कोच्ची येथे कोरोना विषाणूला हरविण्यासाठी गावकऱ्यांनी कंबर कसली असून गाव समितीने लॉकडाऊनच्या काळात सर्व सुविधा गावातच उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना कुठल्याही कामासाठी गावाबाहेर जावे लागणार नाही याची तरतूद झाली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच बारावीच्या परीक्षा आटोपल्या होत्या. मात्र दहावीचा एक पेपर होऊ शकला नाही. तर लॉकडाऊन काळात शाळा-महाविद्यालये बंद झाल्याने व शिक्षकांनाही संचारास बंदी असल्याने उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर परिणाम झाला ...
परस्परांविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून अवधूतवाडी पोलिसांनी सुरुवातीला प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. यात यादव गटातील राजकुमार उर्फ बाबा श्यामराव पवार (३२) याला अटक केली. तर मुराब परिवारातील तातू रमाकांत मुराब, आकाश, गगण या तिघांना अटक केली. ...