घाटंजीत ग्रामसेवक संघटनेचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:00 AM2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:00:38+5:30

सदर ग्रामसेवकाची बदनामी करण्यात आली. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेने केली. संबंधित ग्रामसेवकाचे मानसिक खच्चीकरण होत आहे. तेथे थेट जनतेतून अनुसूचित जमाती प्रवर्गातील सरपंच निवडून आले. ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी कुणीही नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही. पर्यायाने तेथे ग्रामपंचायत कार्यकारणी अस्तित्वात नाही. तेथे निव्वळ नामधारी सरपंच असून आता शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली.

Statement of Ghatanji Gramsevak Sanghatana | घाटंजीत ग्रामसेवक संघटनेचे निवेदन

घाटंजीत ग्रामसेवक संघटनेचे निवेदन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : कापशी-कोपरी येथे काही ग्रामस्थांनी ग्रामसेवकाचे पाय धुवून आरती करण्याचा प्रकार घडला. त्याची व्हीडिओ शूटिंग व्हायरल केली. यामुळे ग्रामसेवकाची बदनामी झाली. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी दोन्ही ग्रामसेवक संघटनांनी बीडीओंना दिलेल्या निवेदनातून केली.
सदर ग्रामसेवकाची बदनामी करण्यात आली. त्यामुळे बदनामी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी ग्रामसेवक संघटनेने केली. संबंधित ग्रामसेवकाचे मानसिक खच्चीकरण होत आहे. तेथे थेट जनतेतून अनुसूचित जमाती प्रवर्गातील सरपंच निवडून आले. ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी कुणीही नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही. पर्यायाने तेथे ग्रामपंचायत कार्यकारणी अस्तित्वात नाही. तेथे निव्वळ नामधारी सरपंच असून आता शासनाने प्रशासकाची नियुक्ती केली. ‘त्या’ लोकांच्या म्हणण्यानुसार सतत तीन महिने ग्रामसेवक गावात आले नाही. मात्र हे म्हणणे खोटे व चुकीचे असून ग्रामसेवकाने एसबीएम व एलओबीअंतर्गत शौचालयाचे बांधकाम केल्याचा दावा ग्रामसेवक संघटनांनी केला आहे.
ग्रामसेवकाने शौचालयाचे फोटोसुद्धा अपलोड केले. रमाई, शबरी, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे प्रस्ताव शासनाकडे सादर केले. नागरिकांना वेळोवेळी दाखले दिले. त्यामुळे अद्याप सचिवाविरुद्ध एकही तक्रार नाही. सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करुन सॅनीटायझर व मास्कचे वाटप केले. या सर्व योजना ग्रामसेवकाने राबविल्या असताना ग्रामसेवक एकटा व आदिवासी असल्यामुळे काहींनी सदर प्रकरण जाणूनबुजून, बदनामी करण्यासाठी घडवून आणल्याचा आरोप संघटनेने केला. या प्रकरणाची चौकशी करून न्याय द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना व महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाने केली. निवेदन देताना संतोष माहुरे, टार्जन बगाटे, प्रियांक घोडे, गुणवंत विरदंडे, मंगेश कुरहाडकर, डी.डी. मुनेश्वर, पी.एस. हिवराळे, जी.आर. इंगोले, एन.बी. नांदणे, महेश मंचलवार, नरेश गुल्हाने, मुळे, रुपेश रघुवंशी, नंदा कांगणे, सुलोचना गजाम, मिना मिसाळ, एन.डी. ठाकरे, अमोल जंंगमवार, श्रीरामे आदी उपस्थित होते.

Web Title: Statement of Ghatanji Gramsevak Sanghatana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.