राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 05:17 IST2026-04-26T05:16:51+5:302026-04-26T05:17:46+5:30
अकोला अन् अमरावती येथे सर्वाधिक ४५.६ अंश तापमान

राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
मुंबई - राज्याला उन्हाच्या चटक्याने भाजून काढले असतानाच दुसरीकडे हवामानात होत असलेल्या बदलामुळे रविवारी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
शनिवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद अकोला व अमरावती येथे ४५.६ अंश सेल्सियस एवढी झाली असून, मुंबईत ३३.७ अंश कमाल तापमान नोंदविण्यात आले आहे. ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस व ताशी ४० ते ५० किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहतील. तर हवामान अभ्यासक अथ्रेय शेटटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेतील बाष्प वाढले आहे. या व्यतिरिक्त पूर्व आणि पश्चिमेकडून वारे जेथे एकत्र येते आहेत; तेथील हवामानात बदल होत आहेत.
कुठे किती तापमान? (अंश सेल्सिअस)
अकोला - ४५.६°
अमरावती -४५.६°
वर्धा - ४५.५°
नंदुरबार - ४४.७°
चंद्रपूर- ४४.२°
नागपूर - ४४.२°
गोंदिया- ४३.६°
मालेगाव - ४३.४°
वाशिम - ४३°
यवतमाळ- ४३°
सोलापूर- ४२°
परभणी - ४२.७°
बुलडाणा - ४२.२°
बीड - ४१.९°
छ. संभाजीनगर - ४१.८°
नाशिक - ४१.५°
अहिल्यानगर - ४१.२°
धाराशिव- ४१°
जालना - ४१°
पुणे - ४०.९°
सांगली - ४०.२°
सातारा- ४०.२°