Next

Maharashtra Bandh : पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तणाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 03:06 PM2018-08-09T15:06:39+5:302018-08-09T15:07:39+5:30

पुणे : सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (9 ऑगस्ट) महाराष्ट्र बंदला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंसक वळण लागले. सकाळपासून पुकारण्यात ...

पुणे : सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (9 ऑगस्ट) महाराष्ट्र बंदला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंसक वळण लागले. सकाळपासून पुकारण्यात आलेल्या  बंदला शहरात दुकाने, बाजारपेठा, सार्वजनिक वाहतुक व्यवस्था उत्स्फूर्तपणे बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला होता. ठिकठिकाणी मराठा समाजातील तरुणांनी दुचाकीवरील रॅली, घोषणाबाजी  करण्यात आल्या. याचवेळी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथे मोर्चाची सांगता झाल्यानंतर काही मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवरुन चढत कार्यालयात तोडफोड केली.