NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 14:15 IST2026-05-19T13:56:33+5:302026-05-19T14:15:32+5:30

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी घोटाळ्या प्रकरणी दररोज नवीन खुलासे होत आहेत. आधी पी.व्ही. कुलकर्णी या प्राध्यापकाला ताब्यात घेतल्यानंतर आता सीबीआयने लातूर येथील शिवराज मोटेगावकर या खासगी क्लास चालवणाऱ्याला ताब्यात घेतले आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. दोन दिवसापूर्वी लातूर येथील RCC कोचिंग क्लासेसच्या शिवराज मोटेगावकरला सीबीआयने ताब्यात घेतले. कोर्टाने 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे.

शिवराज मोटेगावकर हा नीटच्या पेपरफुटीमागील मास्टरमाईंड असल्याचे समोर आले आहे. स्व:त डॉक्टर नसलेला शिवराज मोटेगावकरने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना MBBS ची कोचिंग देऊन डॉक्टर होण्याच त्यांच स्वप्न पुर्ण केले आहे.

शिवराज मोटेगावकरला स्वत:चे मेडिकल कॉलेज सुरू करायचे होते अशी माहिती समोर आली आहे. मला माझे स्व:त मेडिकल कॉलेज टाकायचे आहे, मी अनेकांना डॉक्टर करतो. मात्र माझ स्व:तच मेडिकल कॉलेज नाही, अशी इच्छा शिवराज मोटेगावकर त्याच्या क्लासमधील विद्यार्थ्यांना बोलवून दाखवत होता.

शिवराज मोटेगावकर यानेच नीटचा पेपर लीक केल्याचा संशय आहे. त्याने त्याच्या मुलासाठी पेपर लीक केला होता. त्याच्या मुलानेही यावेळीच परीक्षा दिली आहे.

मोटेगावकर आणि त्याची पत्नी ह्या दोघांपैकी एकही जण MBBS डॉक्टर नाही. जर तुम्हाला स्वत:चे मेडिकल कॉलेज सुरू करायचे असेल तर तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती त्या क्षेत्रात सक्रीय, अनुभवी असण गरजेचे आहे. यामुळे ते मुलाला एमबीबीएस करायला लावून स्वत:चे मेडिकल कॉलेज सुरू करायचे होते, असे बोलले जात आहे.

शिवराज मोटेगावकर याने क्लासेसच्या माध्यमातून कोट्यवधींची माया जमवल्याचा संशय आहे. यामुळे या प्रकरणाचा ईडीही तपास करु शकते.

शिवराज मोटेगावकर याने क्लासेसमधून मोठी संपत्ती जमावल्याचा दावा करण्यात येत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये त्याचे क्लासेस आहेत. त्यांचे राज्यातील ८ मोठ्या शहरांमध्ये मोठ मोठे क्लासेस आहेत यामध्ये लातूर,पुणे, नाशिक, अकोला, छत्रपती संभाजीनगर ,नांदेड, सोलापूर, कोल्हापूर ह्या मोठ्या शहरांचा समावेश आहे.