Next

एक ही मारा पर...ठाकरेंनी सुनावूनही कोश्यारी शांत का बसले? Uddhav Thackeray vs Bhagat Singh Koshyari

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 01:21 AM2022-02-12T01:21:20+5:302022-02-12T01:21:57+5:30

राज्यपाल Bhagat Singh Koshyari आणि मुख्यमंत्री Uddhav Thackeray एका कार्यक्रमात एकत्र आले होते, राष्ट्रपती रामनाथ कोविंदही होते. आता या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना मुख्यमंत्री Uddhav Thackeray उद्धव ठाकरेंनी टोमणा मारला. तोही President Ramnath Kovind यांच्यासमोर. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांची नेहमी कोंडी करणारे राज्यपाल ठाकरेंच्या टोमण्यानंतरही शांत बसले. नेमकं काय झालं, उद्धव ठाकरेंनी कोश्यारींना काय सुनावलं, काय टोमणा मारला, भगतसिंह कोश्यारी शांत का बसले, कोणत्या कार्यक्रमात हे सारं झालं यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना काय टोमणा मारला ते. तर राजभवनातील नवीन दरबार हॉलचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आलं. त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजकीय चिमटे काढले, विशेष म्हणजे त्यांनी राज्यपालांनाही चिमटा काढला. आम्हीही विरोधात होतो पण रोज-रोज राज्यपालांकडे जायचो नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.