Next

ज्ञानदेव वानखेडेचं 'दाऊद वानखेडे' कसं झालं? Explanation of Sameer Wankhade father Dnyandev Wankhede

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 03:18 PM2021-10-26T15:18:27+5:302021-10-26T15:19:18+5:30

समीर वानखेडे हे हिंदू आहेत की मुस्लीम हा वाद आता रंगलाय... त्यांची नोकरी, आर्यन खानवर केलेली कारवाई, साक्षीदाराचे आरोप यामुळे ड्रग्ज प्रकरण गुंतागुतीचं होतं चाललंय.. यात आधी राजकारण रंगलं आणि आता धार्मिक वादही... मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी नोकरी मिळविण्यासाठी धर्म बदलल्याचा आरोप करताना त्यांचे जन्म प्रमाणपत्रच जाहीर केले होते. त्यामुळे, वानखेडे आणि मलिक यांच्यातील संघर्ष टोकाला आता वैयक्तिक पातळीवर गेलाय. नवाब मलिकांच्या आरोपांना आता थेट समीर वानखेडेंच्या वडिलांनीच उत्तर दिलीय.