Next

एक्सप्रेस वेचं लोकार्पण...मायावती-अखिलेश हरले, योगींचं काय होणार? Purvanchal Expressway inauguration

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 03:09 PM2021-11-17T15:09:13+5:302021-11-17T15:09:31+5:30

Yogi Adityanath यांनी पूर्वांचल एक्स्प्रेस वेचं लोकार्पण केलंय, पंतप्रधान Narendra Modi लोकार्पण सोहळ्याला जातीनं हजर होते. हा एक्स्प्रेस वे म्हणजे पूर्वांचलमधल्या मतदारांना आकर्षित करण्याचा भाजपचा एक प्रयत्न मानला जातोय. पण उत्तरप्रदेशची सत्ता आणि उत्तरप्रदेशमध्ये बनणारे एक्स्प्रेस वे यांचं नात थोडं वेगळं आहे, जो उत्तरप्रदेशचा मुख्यमंत्री एक्स्प्रेस वेचं उदघाटन किंवा लोकार्पण करतो, त्याची सत्ता गेलीय. म्हणजे पहिल्यांदा मायावती हरल्या, मग अखिलेशनं खुर्ची गमावली. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वीच अखिलेश आणि त्यापूर्वी मायावती या एक्स्प्रेस वेशी जोडल्या गेल्या होत्या. आता योगी आदित्यनाथांनी तर चक्क पूर्वांचल एक्स्प्रेसवेचं लोकार्पण केलंय. विशेष म्हणजे एप्रिलमध्येच उत्तरप्रदेश निवडणुका आहेत आणि त्यामुळेच आता चर्चा सुरु झाल्यात.