मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 14:52 IST2026-04-27T14:36:09+5:302026-04-27T14:52:33+5:30

मनोहर भोसले हा व्हीआयपी भक्तांसाठी मुंबईत दरबार भरवत असल्याचे पोलिस चौकशीत उघड

Manohar Bhosale has been holding court in Mumbai for VIP devotees | मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर

मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर

Manohar Mama Bhosale: भोंदूबाबा मनोहर भोसले ऊर्फ मनोहरमामा व साथीदार विशाल वाघमारे याच्यावर जादूटोणा व आर्थिक फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर कुडूवाडी पोलिसांनी अटक करून माढा न्यायालयात दोघांना उभे केले. न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. पोलिसांनी वेगवेगळ्या दिशेने आरोपींचा तपास सुरू केला आहे. रविवारी दिवसभर सोलापूरच्या गुन्हे अन्वेषण शाखेसह कुईवाडी पोलिसांच्या पथकाने आरोपींची कसून चौकशी केली आहे. चौकशी दरम्यान मुंबईत आलिशान हॉटेलमध्ये हा भोंदूबाबा व्हीआयपी भक्तांसाठी मागील काही महिन्यांपासून दरबार भरवत असल्याचे उघड झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोलापूर ग्रामीणच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप व कुईवाडीचे पोलिस निरीक्षक अतुल मोहिते यांच्या पथकाने केलेल्या तपासणीत अनेक विषयावर त्याला प्रश्न विचारण्यात आले. त्याला अर्धवट उत्तरे त्याच्याकडून मिळाली. यादरम्यान आर्थिक फसवणुकीच्या जाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी संबंधित मोबाइल नंबरवरील कॉल संभाषण, व्हिडीओ कॉल यासह विविध प्रश्नांवर पोलिसांची सायबर ब्रांचही काम करत असल्याचे दिसून आले. दिवसभर कुईवाडी पोलिस ठाण्याच्या गोपनीय कक्षेत आरोपींना बसून तपासणी करण्यात आली.

यादरम्यान, भोंदूबाबा मनोहर भोसले या आरोपी विशाल वाघमारे याला पोलिसांनी सोलापूर जिल्हा सोडून राज्यात इतर कोणत्या जिल्ह्यांत त्याची - संपत्ती, मठ व धार्मिक आश्रम आहेत का, - पूर्वीच्या दाखल असलेल्या गुन्ह्यासारखे - इतर काही महिलांवरती अत्याचार वगैरे झालेत का? या बाजूनेही पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू आहे. याबरोबरच निंभोरे रोड, घोटी (ता. करमाळा) येथे कार्यरत असलेल्या मठात आणखी इतर काही कारनामे चालतायत का? याबाबतही पोलिसांनी काही पथके नियुक्त करून शनिवारच्या दुपारपासूनच विविध मार्गाने तपास सुरू असल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले. तपासानंतर कुडूवाडी पोलिस ठाण्यातून हलवून त्याला करमाळा येथील लॉकअपमध्ये ठेवण्यात येणार आहे.

पोलिस गाडी अचानक बंद

भोंदूबाबा मनोहर भोसले व साथीदार विशाल वाघमारे याला माढा न्यायालयात घेऊन जाणारी पोलिस व्हॅन (क्रमांक एमएच १३-डीएम ९४७९) न्यायालयातून त्यांना पोलिस कोठडी मिळाल्यानंतर पुन्हा माघारी कुडूवाडी पोलिस ठाण्यात पोहोचताच शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत गाडीत बिघाड झाल्याने बंद अवस्थेत होती. त्याला पोलिसांनी फिटर लावून दुरुस्त करण्यात आले. ही पोलिस गाडी अचानक बंद पडल्याने मात्र चर्चेस उधाण आले.

अनेक व्हीआयपी भक्तांशी कनेक्शन

भोंदूबाबा मनोहर भोसलेचे अनेक व्हीआयपी भक्त असून, त्याचे कनेक्शन पोलिस तपासादरम्यान उघड होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर अनेक वरिष्ठ नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे फोटो त्याच्याबरोबर व्हायरल होत असल्याने वरिष्ठ पोलिस अधिकारी त्या दिशेनेही त्याची चौकशी करीत आहेत. त्याच्याबरोबरच त्याच्या घरातील सदस्यांबरोबरच काही नातेवाइकांच्या नावावरदेखील संपत्ती निर्माण झाली का, याबाबतही तपास करण्यात येत आहे.

Web Title : मुंबई के होटल में 'वीआईपी' दरबार; मनोहर मामा के भक्त पुलिस रडार पर

Web Summary : धोखाधड़ी के आरोप में गिरफ्तार मनोहर मामा भोसले मुंबई के होटलों में वीआईपी दरबार लगाते थे। पुलिस उनकी संपत्ति, अनुयायियों और संभावित अपराधों की जांच कर रही है, जिसमें दुर्व्यवहार भी शामिल है। वीआईपी कनेक्शन जांच के दायरे में।

Web Title : Mumbai Hotel Hosted VIP Darbar; Manohar Mama's Followers Under Police Radar

Web Summary : Manohar Mama Bhosale, arrested for fraud, held VIP darbars in Mumbai hotels. Police investigate his assets, followers, and potential crimes, including abuse, across districts. VIP connections under scrutiny.