Next

कंत्राटदाराची महिला आमदाराच्या पतीला शिवीगाळ, धमकी | Audio Clip Viral | Maharashtr News

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 01:21 PM2021-10-04T13:21:24+5:302021-10-04T13:22:18+5:30

रस्त्याच्या कामावरुन एका कंत्राटदारानं महिला आमदाराच्या पतीला फोनवरुन जोरदार शिवीगाळ केली, इतकंच नाही तर धमकीही दिली. त्याची ऑडिओ क्लिप आता व्हायरल होतेय. बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यांना फोनवरुन शिवीगाळ करण्यात आलीय. कंत्राटदार ऋषिकेष लोमटे यांनी मुंदडा यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. देवस्थानच्या रस्त्याच्या कामावरुन हा प्रकार घडला.