Next

आग लगे बस्ती मे, हम जिये...महिलांसोबतच्या फोटोवर थरुर यांनी माफी का मागितली? | Shashi Tharoor selfie

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 12:34 PM2021-12-02T12:34:35+5:302021-12-02T12:38:17+5:30

तिरुअनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरुर. हटके स्टाईल, हटके अदा आणि महिलांसोबतच्या सेल्फीमुळे थरुर कायम चर्चेत असतात. कधी क्रिकेट मॅचदरम्यान अभिनेत्रीसोबतची गपशप.. कधी हेमा मालिनीसोबत संसदेतला गप्पा मारतानाचा फोटो तर कधी कंगनासोबतचा सेल्फी...असाच एक सेल्फी थरुरांनी टाकला खरा पण त्यामुळे ते अडचणीत आले. कदाचित असं पहिल्यांदाच झालं असेल की महिलांसोबतच्या एका सेल्फीमुळे थरुर अडचणीत आले. इतका वाद झाला की थरुरांना माफी मागावी लागली.