Next

आंदोलनस्थळीच नवरदेवाला लागली हळद; महावितरणविरोधात करत आहे उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2019 01:42 PM2019-07-18T13:42:20+5:302019-07-18T13:43:50+5:30

अमरावती - बदल्यांमध्ये अन्याय झाल्याच्या मुद्द्यावर उपोषण करीत असलेले वीज कर्मचारी निखिल तिखे यांचा विवाह १९ जुलै रोजी होत ...

अमरावती - बदल्यांमध्ये अन्याय झाल्याच्या मुद्द्यावर उपोषण करीत असलेले वीज कर्मचारी निखिल तिखे यांचा विवाह १९ जुलै रोजी होत आहे. अमरावती येथील महावितरणच्या मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयापुढे त्यांच्यासह काही जण उपोषण करीत आहेत. गुरुवार, १८ जुलैला उपोषणस्थळीच नवरदेवाला हळद लागली. यावेळी वीज कर्मचारी व अधिकाऱ्यांसोबत वरपक्ष व वधुपक्षातील मंडळीही महावितरणच्या आवारात होती. शुक्रवार, १९ जुलैला याच ठिकाणी लग्न लावण्याचा आणि मागण्या मान्य न झाल्यास उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार निखिल तिखे यांनी व्यक्त केला आहे. (व्हिडीओ - मनीष तसरे)