महालक्ष्मी एक्सप्रेस मध्यरात्री दीडच्या सुमारास राजेवाडी-जेजुरी दरम्यान सिग्नलला थांबली असताना तिच्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला़. चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले़. ...
सांगली शहर व विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी झाली असून अज्ञात चोरट्यांनी या दोन्ही ठिकाणाहून ८० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी दोन्ही पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
रेल्वे प्रवाशांच्या बॅग चोरणार्यास पुणे आरपीएफच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून रेल्वे प्रवाशांचे चोरी केलेले सोन्याचे दागिने व अन्य सामान असा एकूण ४ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
सातारा शहराजवळील संभाजीनगरमधील एका शाळेत दिवाळीच्या सुटीदरम्यान चोरी झाली. अज्ञाताने शाळेतून एलईडी कॉम्प्युटर, मॉनिटर, प्रोजेक्टर असे ६३ हजार ५०० रुपयांचे साहित्य लंपास केले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. ...
एक हजारापेक्षाही जास्त चोरीच्या घटनांमध्ये सामील असणा-या सुपरचोराला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांना चकवा देण्यासाठी या चोराने प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र पोलिसांनी कारवाई करत दक्षिण दिल्लीमधून त्याला अटक केली आहे. ...
ओटवणे बँक आॅफ इंडियाच्या शाखेत चोरी करण्याचा धाडसी प्रयत्न अज्ञात चोरट्याकडून करण्यात आला. पण बँकेच्या आतमधील पैशांच्या कपाटाचे कुलूप न तुटल्याने चोरट्याला पैशांवर डल्ला मारता आला नाही. ...