कामगार वर्गाच्या मजुरीबरोबरच, इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे देवरूख परिसरातील चिरेखाण मालकांनी चिऱ्याच्या दरात वाढ केली आहे. याला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन चिरेखाण मालकांनी केले आहे. ...
देवरूख आठवडा बाजारात होणाऱ्या चोऱ्यांमध्ये वाढ होत आहे. २१ रोजी आठवडा बाजारात खरेदीसाठी आलेल्या दोन तरूणांचे मोबाईल चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी हैद्राबाद येथील एका महिलेवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे. ...
लडाख येथे चीनच्या सशस्त्र हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांना जिल्हा पोलीस दलातर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी गेल्या वर्षभरात पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले त्यांनाही आदरांजली वाहण्या ...
परदेशी नागरिक असल्याचे भासवताना किंमती वस्तू भेटवस्तू म्हणून पाठवण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करण्याचा एक अनोखा फंडा सध्या सोशल मिडियावर विशेष करून फेसबुकवर सुरु आहे. रत्नागिरीत उघडकीस आलेल्या तवंगर जमादार झारी (आदमपूर, रत्नागिरी) यांच्या फस ...
संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथील काजळी नदीच्या पात्रात आंघोळ करत असताना औरंगाबादच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. वैभव मधुकर साळुंखे (२५, श्रीरामनगर, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) असे या मृताचे नाव आहे. ...
दुष्काळाच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या समितीने तालुक्यातून ११पैकी ३ कृषी मंडळ विभागातील ३ गावांचा प्रात्यक्षिक पाहणी दौरा केला. ...
दीपावलीच्या सुट्टीत प्रवाशांची गर्दी बऱ्यापैकी असते. एस. टी.ला होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी वीस दिवसांसाठी हंगामी भाडेवाढ करण्यात येणार असून ...
गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेच्या गाड्यांना मिळालेल्या प्रतिसादानंतर दिवाळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर जादा गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. दि. २ नोव्हेंबरपासून या गाड्या धावणार आहेत. आता दिवाळीसाठी कोकणात येणाऱ्या प्रवाशांची वाढती ...