राज्यसभा Rajya Sabha हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. Read More
आक्रमक विरोधकांमुळे राज्यसभेचे कामकाज बुधवारी तब्बल १0 वेळा तहकूब झाले. मोदी सरकारने प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र भ्रष्टाचार निवारण दुरुस्ती विधेयकावर अखेरपर्यंत चर्चा होऊ शकली नाही. चर्चेविनाच विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्नही फसला. ...
राज्यसभेवर निवडून गेलेल्या ५८ पैकी ४१ सदस्यांचा शपथविधी मंगळवारी पार पडला. शपथविधी झालेल्यांमध्ये अरुण जेटली, धर्मेंद्र प्रधान, प्रकाश जावडेकर, जे. पी. नड्डा , थावरचंद गहलोत या मंत्र्यांबरोबरच महाराष्ट्रातून निवडून गेलेले नारायण राणे, अनिल देसाई, कुम ...
‘मास्टर ब्लास्टर’ क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकरने राज्यसभा सदस्य या नात्याने सहा वर्षांत वेतन आणि भत्ते म्हणून मिळालेली सुमारे ९० लाख रुपयांची संपूर्ण रक्कम पंतप्रधान सहाय्यता निधीला दान केली आहे. ...
एकूण २४५ सदस्यांच्या राज्यसभेत बहुमतासाठी १२६ चा आकडा गाठणं आवश्यक आहे. मात्र, भाजपा आणि मित्रपक्षांच्या सदस्यांची एकत्रित संख्या त्यापेक्षा कमी आहे. ...