भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
अर्थसंकल्पात विविध खात्यांसाठी 2019 साली जो निधी दाखविण्यात आला होता, तो निधी अर्थ खात्याने अन्य खात्यांना दिलेलाच नाही. यामुळे कामे अर्धवट स्थितीत आहेत. ...
म्हादई पाणी तंटा लवादाला मुदतवाढ दिलेली आहे. येत्या ऑगस्टपर्यंत लवादाचे काम चालणार आहे. तसेच तिन्ही राज्यांनी लवादाच्या निवाड्य़ाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर केली आहे. त्यावर जुलैमध्ये सुनावणी होणार आहे. ...
म्हादई नदीत 113.57 टीएमसी एवढेच पाणी आहे. ते 188 टीएमसी असल्याचा म्हादई पाणी तंटा लवादाने काढलेला निष्कर्ष चुकीचा आहे, असे गोव्याच्या जलसंसाधन खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ...
कर्नाटकचे केंद्रीय नेते प्रल्हाद जोशी यांच्यासह तेथील सगळे महत्त्वाचे नेते केंद्रीय जलशक्ती मंत्रलयाच्या मंत्र्यांना 26 रोजी भेटतात व दुसऱ्याच दिवशी म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा अधिसूचित होतो. ...
गोव्यात पूर्वीच्या तुलनेत आता शिवजयंती जास्त मोठय़ा प्रमाणात साजरी होते. 30 वर्षापूर्वी गोव्यात शिवाजी महाराजांचे काही पुतळे होते. गेल्या वीस वर्षात पुतळ्य़ांची संख्या वाढली. ...