शिवजयंती : गोवा व शिवरायांच्या संबंधांना सरकारकडून उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 12:11 PM2020-02-19T12:11:51+5:302020-02-19T12:34:34+5:30

गोव्यात पूर्वीच्या तुलनेत आता शिवजयंती जास्त मोठय़ा प्रमाणात साजरी होते. 30 वर्षापूर्वी गोव्यात शिवाजी महाराजांचे काही पुतळे होते. गेल्या वीस वर्षात पुतळ्य़ांची संख्या वाढली.

shivaji jayanti 2020 chhatrapati shivaji maharaj and goa | शिवजयंती : गोवा व शिवरायांच्या संबंधांना सरकारकडून उजाळा

शिवजयंती : गोवा व शिवरायांच्या संबंधांना सरकारकडून उजाळा

Next
ठळक मुद्देगोवा व छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज यांचा मोठा संबंध एकेकाळी गोव्याशी आला होतासरकारने शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने गोवा व शिवरायांच्या संबंधांना उजाळा दिला.शिवरायांच्या गोव्यातील स्मृती अधिक जागृतपणे व अधिक चांगल्या प्रकारे जपून ठेवण्याचे सरकारने ठरविले आहे.

पणजी - गोवा व छत्रपती शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराज यांचा मोठा संबंध एकेकाळी गोव्याशी आला होता. गोव्यात त्याविषयीचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. सरकारने शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने बुधवारी (19 फेब्रुवारी) गोवा व शिवरायांच्या संबंधांना उजाळा दिला.

गोव्यात पूर्वीच्या तुलनेत आता शिवजयंती जास्त मोठय़ा प्रमाणात साजरी होते. 30 वर्षापूर्वी गोव्यात शिवाजी महाराजांचे काही पुतळे होते. गेल्या वीस वर्षात पुतळ्य़ांची संख्या वाढली. उत्तर गोव्यात हिंदू लोकांची संख्या जास्त आहे. उत्तरेतील साखळी, डिचोली, वाळपईसह अन्य अनेक भागांत शिवाजी महाराजांच्या पुतळ्य़ांची संख्या वाढली. अधूनमधून पुतळ्य़ांवरून राजकारणही झाले. दक्षिण गोव्यातील केपे, सांगे, काणकोण अशा तालुक्यांतही शिवभक्तांची संख्या मोठी आहे. फोंडा तालुक्यातील फर्मागुडी येथे तर दरवर्षी शिवजयंती सरकारी पातळीवरून मोठय़ा उत्साहात साजरी केली जाते. यापुढे शिवरायांच्या गोव्यातील स्मृती अधिक जागृतपणे व अधिक चांगल्या प्रकारे जपून ठेवण्याचे सरकारने ठरविले आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वत: शिवभक्त आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री गोविंद गावडे हे स्वत: नाटकांमध्ये शिवरायांची भूमिकाही पार पाडतात. मुख्यमंत्री सावंत यांनी शिवजयंतीनिमित्ताने बुधवारी शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचा गोव्याशी कसा संबंध होता ते सांगितले. फोंडा, डिचोली, सत्तरी आदी अनेक तालुके शिवरायांच्या अधिपत्त्याखाली आले होते. शिवरायांना पोर्तुगीजांशी तह करावा लागला, अन्यथा शिवाजी महाराजांनी पूर्ण गोवा ताब्यात घेतला असता, असे मुख्यमंत्री म्हणाले. गोव्यात शिवकालीन राज्य आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. शिवाजी महाराज हे रयतेचे राजा होते. शिवकालीन राज्य गोव्यात नव्याने अवतरण्यासाठी प्रजेचा प्रतिसाद मिळायला हवा. शिवकालीन राज्य आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही कोणीच शिवाजी महाराज होऊ शकत नाही पण शिवरायांचे गुण काही प्रमाणात तरी आम्ही अंगीकारायला हवेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

शिवजयंती : महाराजांची किर्ती बेफाम... 'या' कारणांमुळे शिवराय ठरतात जगातले सर्वोत्तम राजे!

भारतासोबत ट्रेड डील करण्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनीच उपस्थित केली शंका

तरुण शेतकऱ्यांना मोदींचं गिफ्ट! व्यवसायासाठी सरकार देणार 3.75 लाख रुपये, असा घ्या फायदा... 

भारतातल्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; यंदा मिळणार 'इतकी' पगारवाढ

Jammu And Kashmir : त्राल चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

 

Web Title: shivaji jayanti 2020 chhatrapati shivaji maharaj and goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.