पूर्णा ते झिरोफाटा मार्गावरील अर्धा कि.मी.च्या रखडलेल्या रस्त्यावर १३ नोव्हेंबर रोजी वाहनाचा ताबा सुटून झालेल्या अपघातात पूर्णा येथील सेवानिवृत्त प्राध्यापकाचा मृत्यू झाला असून त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. ...
विष्णूपुरीतील पाणी सांभाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानेही आता कठोर भूमिका घेण्याचा निर्णय मंगळवारी नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. ...
शेतीसाठी करपरा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पुलावरील नादुरुस्तीमुळे वाया जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यानंतर पाटबंधारे विभागाने या कालव्याचे पाणी बंद केले आहे़ ...
जिल्ह्यातील देवठाणा, पिंपळगाव, संबर, सुकापूरवाडी व बोबडे टाकळी या गावांतील कृषीपंप धारांना व वीज ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १३ नोव्हेंबर रोजी परभणी येथील महावितरण कार्यालयात भजन, कीर्तन ...
भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत लोकप्रतिनिधींनी शिफारस केलेल्या जिल्ह्यातील ६१ कामांसाठी ५ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधी वितरणास तत्वत: मंजुरी देण्यात आली असून, पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला २ कोटी १६ लाख रुपये वितरित करण्यात आले ...
देशात सर्वाधिक किंमतीमध्ये इंधन खरेदीचा परभणीकरांचा उच्चांक कायम असला तरी गेल्या ३८ दिवसांमध्ये तब्बल ८ रुपये २६ पैसे प्रति लिटर पेट्रोलच्या किंमतीमध्ये कपात झाल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे. ...
इच्छितस्थळी बदली मिळवून घेण्यासाठी प्रशासनास खोटी माहिती देणाºया २४ प्राथमिक शिक्षकांना जिल्हा परिषद प्रशासनाने अभय दिले असून या प्रकरणी संबंधितांवर कारवाई होत नसल्याने इतर शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. ...