निवडणूक कोणतीही असो गल्लीची अथवा दिल्लीची. त्या सुरळीत पार पाडण्याची मुख्यत्वे जबाबदारी येऊन ठेपते ती ‘खाकी’वरच. सकाळी मतदान सुरू होण्यापासून ते सायंकाळी उशिरापर्यंत ईव्हीएम यंत्रे सील करेपर्यंत पोलिसांना सक्तीने थांबावे लागले. घड्याळाचा काटा जसाजसा ...
इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील एक शाकाहारी ढाबा रात्रीच्या सुमारास बळजबरीने बंद करताना पोलीस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाºयाने ‘दबंगगिरी’ केल्याचा प्रकार उघडकीस आला. ...
: शहरात राहून शरीराविरुद्ध गुन्हे करणारे तसेच दारुविक्रे ते, शांतता भंग करू पाहणाऱ्या एकूण ७६ संशयितांना कायदासुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने शनिवारपासून (दि.२७) शहराच्या हद्दीबाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...
पोलीस आयुक्तालयातील १३ पोलीस ठाण्यांसाठी दैनंदिन कामकाजाशी संबंधित अकरा मुद्द्यांवर घेण्यात आलेल्या पोलीस आयुक्तांच्या परीक्षेत भद्रकाली पोलीस ठाण्याने प्रथम क्रमांक पटकाविला. ...
तब्बल दहा दिवसांपूर्वी हिरावाडीतील गुंजाळमळा येथे चेंबरमध्ये मृतदेह आढळलेल्या विकी उर्फ टेंभ्या विजय भुजबळ (१९) या सराईत गुन्हेगाराचा खून त्याचा चुलत भाऊ असलेल्या रोहन भुजबळ याने मित्राच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. ...
तपोवन चौफूलीवरील रस्ता ओलांडत असताना पल्सरसारख्या मोटारसायकलवरून दोघे अज्ञात चोरटे भरधाव आले व त्यांनी त्यांच्या गळ्यात असलेला साडेतीन तोळे वजनाचा सुमारे ७० हजार रूपये किंमतीचा ‘राणी हार’ ओरबाडून धूम ठोकली. ...
दत्तनगर परिसरात राहणारे संशयित आरोपी आकाश काळे व अजित कापसे असे दोघेजण एका मुलाशी भांडण करत असताना फिर्यादी त्या ठिकाणी गेले व त्यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता संशयितांना राग आल्याने त्यांनी दगड, विटांनी फिर्यादीला मारहाण केली ...
मुंबईच्या एका स्टील व्यावसायिकाची फसवणूक करत सुमारे पंधरा लाख रुपये किमतीच्या लोखंडी सळ्या सिन्नर येथून भिवंडीला पोहचविण्याऐवजी दुसरीकडे घेऊन जात फसवणूक केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. ...