गुन्हेगार टेंभ्याचा कौटुंबिक वादातून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:05 AM2019-04-26T01:05:36+5:302019-04-26T01:06:43+5:30

तब्बल दहा दिवसांपूर्वी हिरावाडीतील गुंजाळमळा येथे चेंबरमध्ये मृतदेह आढळलेल्या विकी उर्फ टेंभ्या विजय भुजबळ (१९) या सराईत गुन्हेगाराचा खून त्याचा चुलत भाऊ असलेल्या रोहन भुजबळ याने मित्राच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

The murderer from a family dispute of a criminal hangar | गुन्हेगार टेंभ्याचा कौटुंबिक वादातून खून

गुन्हेगार टेंभ्याचा कौटुंबिक वादातून खून

Next

पंचवटी : तब्बल दहा दिवसांपूर्वी हिरावाडीतील गुंजाळमळा येथे चेंबरमध्ये मृतदेह आढळलेल्या विकी उर्फ टेंभ्या विजय भुजबळ (१९) या सराईत गुन्हेगाराचा खून त्याचा चुलत भाऊ असलेल्या रोहन भुजबळ याने मित्राच्या मदतीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत दोघांना ताब्यात घेतले असून, मयत टेंभ्या कौटुंबिक वादातून जिवे मारण्याची धमकी देऊन त्रास द्यायचा म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी दृश्यम सिनेमा बघून खुनाचा कट रचल्याची कबुली संशयितांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी रोहन भुजबळ व त्याचा मित्र अनिल भोंड या दोघांना ताब्यात घेतले आहे.
भुजबळ गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याचा घात केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली व त्यादृष्टीने पंचवटी पोलीस तसेच गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास सुरू केला. मयत भुजबळ याला शेवटचे रात्री कोण भेटले, कोणी बघितले याची माहिती जमा करण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असता विकी हा त्याच्या चुलत भावाबरोबर बुलेटवर बसून गेल्याचे काहींनी बघितले होते. नंतर पोलिसांनी रोहनला ताब्यात घेत चौकशी केली असता दि.१२ एप्रिलला भुजबळ रोहनच्या आइस्क्र ीम दुकानावर गेला. तेथे आइस्क्र ीम खाल्ल्यानंतर रोहनच्या पुतण्या प्रतीकने पैसे मागितल्यावर टेंभ्याने वाद घातला. त्याने यापूर्वी अनेकदा रोहनला विक्र ी केलेले घर परत देण्याची मागणी करत ठार मारण्याची धमकी दिली होती. घटनेनंतर दि.१३ एप्रिलच्या रात्री संशयित आरोपींनी टेंभ्याला दारू पिण्याच्या बहाण्याने बुलेटवर बसवून गुंजाळमळा परिसरात नेले. तेथे भरपेट दारू पिऊन शुद्ध हरपलेल्या टेंभ्याला चेंबरमध्ये टाकून दिले होते. पोलीस निरीक्षक के. डी. पाटील, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
बारा दिवसांपूर्वी हिरावाडी गुंजाळमळा येथे सुमारे २0 फूट खोल चेंबरमध्ये एका इसमाचा मृतदेह आढळून आला होता. चेंबरजवळ कुत्रे भुंकत असल्याने शरद गुंजाळ यांनी पाहणी केली असता चेंबरमध्ये मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी पंचवटी पोलिसांना माहिती दिली होती. मयताच्या अंगावर कोणत्याही जखमा नसल्याने सदरचा प्रकार खुनाचा नसल्याची शक्यता वर्तविली जात होती. दोन दिवसांनी चेंबरमध्ये आढळलेला मृतदेह सराईत गुन्हेगार टेंभ्या उर्फ विकी भुजबळ याचा असल्याचे निष्पन्न झाले होते.

Web Title: The murderer from a family dispute of a criminal hangar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.