मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मंत्रालयासमोरील आमदार निवासाच्या इमारती पाडण्याची कार्यवाही १ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार असून तेथे राहणाऱ्या आमदारांनी ३१ डिसेंबरपूर्वी खोल्या रिकाम्या कराव्यात, असे आदेश विधानमंडळ सचिवालयाने दिले आहेत. ...
गेले ५५ दिवस आंदोलन करणाऱ्या माहुलकरांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली़ या भेटीत प्रकल्पबाधितांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी समिती स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले ...
आर्थिक संकटात असल्याने जादा महसुलासाठी नवीन प्रयोग करणाऱ्या बेस्ट उपक्रमाला तिथेही नुकसान सहन करावे लागत आहे. वांद्रे संकुल ते वांद्रे स्थानक या दरम्यान गेले आठ महिने हायब्रीड वातानुकूलित बस गाड्या बेस्ट चालवत आहे. ...
आई रागावल्याने अल्पवयीन मुलीने मैत्रिणीसह घर सोडल्याचा प्रकार चेंबूरमध्ये उघडकीस आला. चेंबूर पोलिसांनी दोघींचा शोध घेत त्यांना पालकांच्या ताब्यात दिले. ...