Ganpati Festival 2025 News in Marathi | गणपती उत्सव २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ganpati festival, Latest Marathi News
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
शाहूपुरी सातवी गल्ली येथील श्री पंचमुखी गणेश मंदिरात पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त शनिवारी पहाटेपासून दशभूजा गणेशदर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे पाच ते रात्री बारापर्यंत दर्शनाचा योग होता. ...
कलासाधनेच्या कलादालनात अप्रतिम कलाविष्काराने नटलेल्या बाप्पाच्या २५ मूर्तींचा ताफा येत्या चार ते पाच दिवसांत मॉरिशस देशात रवाना होणार असल्याचे पेण शहरातील कलाकेंद्राचे गणेशमूर्तीकार सचिन समेळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ...
‘वक्रतुण्ड महाकाय सुर्यकोटी समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देंव, सर्व कार्येषु सर्वदा ।।’असा जयघोष, गणेशयाग, होमवहन, प्रवचन, भजन अशा भक्तिमय व उत्साही वातावरणात कोल्हापूर शहर, उपनगरात शुक्रवारी गणेश जयंती साजरी झाली. ...
आजपासून माघ महिन्यातील माघी गणेश सोहळा सुरु झाला असूनभाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव मंडळात ज्याप्रमाणे मोठमोठे सेट्स व देखावे, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, आकर्षक गणेशमुर्ती हा ट्रेन्ड आता माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळामध्येही दिसून येत आहे. ...
देशात राष्ट्रगीत आहे. राष्ट्रचिन्ह, राष्ट्रध्वज आहे. पण आपल्याकडे राष्ट्रदेव नाही. जिथे लोकशाहीचे राज्य आहे, तिथे सर्वगुणसंपन्न गणपतीला राष्ट्रदेव म्हणून मान्यता मिलायला हवी, अशी अपेक्षा आध्यात्मिक गुरु रमेशभाई ओझा यानी व्यक्त केली. ...