नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 09:41 IST2026-05-06T09:40:47+5:302026-05-06T09:41:18+5:30

Nasrapur case: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त करत या प्रकरणातील आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो, किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करून संपवावं अशी मागणी केली होती. त्यावरून आता वकील असीम सरोदे यांनी अशा चिथावणीखोर  वक्तव्यांमुळे राज ठाकरेंविरोधात गुन्हाही दाखल  होऊ शकतो असा दावा केला आहे. 

Nasrapur case: ...then a case can be filed against Raj Thackeray, claims Asim Sarode | नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा

नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा

नसरापूर येथे एका नराधम इसमाने साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या केल्याच्या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा तातडीने देण्याची मागणी सर्वच स्तरांमधून होत आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त करत या प्रकरणातील आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो, किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करून  संपवावं अशी मागणी केली होती. त्यावरून आता वकील असीम सरोदे यांनी अशा चिथावणीखोर  वक्तव्यांमुळे राज ठाकरेंविरोधात गुन्हाही दाखल  होऊ शकतो असा दावा केला आहे. 

राज ठाकरे  यांनी नसरापूर प्रकरणातील आरोपीला शिक्षा देण्याबाबत केलेल्या मागणीवर प्रतिक्रिया देताना असीम सरोदे यांनी सांगितले की, नसरापूर प्रकरणातील आरोपीला १०१ टक्के फाशीची शिक्षाच होणार आहे. मात्र याप्रकरणी काहीजण बेताल वक्तव्य करून लोकांना कायदा हातात घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणातील आरोपीला चौरंगा करा, त्याला हाल हाल करून मारा अशा प्रकारची मागणी प्रवीण तरडे, राज ठाकरे आदींकडून केली जात आहे. या प्रकरणातील  आरोपीला ठार मारणाऱ्याला आमदार, खासदार करा, असेही प्रवीण  तरडे यांनी म्हटले  आहे. मग प्रवीण तरडे हे स्वत:च का आरोपीला मारायला जात नाहीत? असा सवालही सरोदे यांनी विचारला.

ते पुढे म्हणाले  की, राज ठाकरे यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्य असल्या तरी कायद्याचं एक तत्त्व आहे. या प्रकरणातील आरोपीला त्याची बाजू मांडू दिली पाहिजे.  तसेच कायद्याच्या माध्यमातूनच आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. राज ठाकरे यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने अशा प्रकारची विधानं करून लोकांना कायदा हातात घेण्यासाठी चिथावणी देणं योग्य नाही. त्यामुळे त्यांनी अशा  प्रकारची विधानं करू नयेत, अशी समज पोलिसांनी राज ठाकरे यांना दिली पाहिजे. तसेच अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हाही नोंदवला i, असेही सरोदे यांनी सांगितले. 

काय म्हणाले होते राज ठाकरे
र मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल नसरापूर प्रकरणी आपली रोखठोक भूमिका मांडली स्पष्ट  केली होती. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली, असे सांगत राज ठाकरे यांनी या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं, असा सल्ला दिला होता. सरकार अशा घटनांमध्ये जेंव्हा फास्टटट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेंव्हा सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या पण सांगावी. कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्रात मुली, स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आणि असं नाहीये ते एखाद्या वर्षीच वाढत आहे, तर ते वर्षागणिक वाढत आहे, याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. त्यात या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या पण आल्या. ही तत्परता स्त्रियांचं, मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही ? असा  सवाल राज  ठाकरे यांनी उपस्थित केला.  

Web Title : नसरापूर मामले में राज ठाकरे पर आरोप लग सकते हैं: वकील

Web Summary : वकील असीम सरोदे का दावा है कि राज ठाकरे का नसरापूर बलात्कार-हत्या मामले में सतर्कतापूर्ण न्याय का आह्वान आरोपों को जन्म दे सकता है। उन्होंने ठाकरे के भड़काऊ बयानों की आलोचना की, पुलिस से आग्रह किया कि वे उनकी भावना को समझने के बावजूद सार्वजनिक हिंसा भड़काने के खिलाफ उन्हें चेतावनी दें।

Web Title : Raj Thackeray could face charges over Nasrapur case: Advocate

Web Summary : Lawyer Aseem Sarode claims Raj Thackeray's call for vigilante justice in the Nasrapur rape-murder case could lead to charges. He criticized Thackeray's inflammatory statements, urging police to caution him against inciting public violence, despite understanding his sentiment.