ऑनलाईन लोकमतवैरागड : कुरखेडा तालुक्यातील शिरपूर, वाढोणा, भगवानपूर येथील नागरिकांनी एफडीसीएमच्या वृक्षतोडीविरोधात एल्गार पुकारला होता. त्यानंतर मंगळवार १३ मार्चला आ. कृष्णा गजबे व एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत पुढील निर्णयापर्यंत वृक्षतोड बंद कर ...
गिरगांव (ता. शाहूवाडी) येथील वनविभागात पाठीवर अडकवलेल्या बारा बोअर बंदुकीतून गोळी सुटून छायाचित्रकार गंभीर जखमी झाला होता. ही बंदूक बेकायदेशीर वापरल्याप्रकरणी छायात्रिकारासह बंदूक मालकावर शाहुवाडी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला. ...
आरे कॉलनी येथील युनिट क्रमांक ३२मधील आंब्याच्या झाडाच्या खोडावर खोल छिद्र पाडून त्यात अॅसिडसदृश विषारी द्रव्याचा वापर करत झाड मारण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणी वनराई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. ...
जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा तालुक्यात १६० दशलक्ष वर्षापूर्वीचे डायनासोरचे अवशेष तीन वर्षापूर्वी मिळाले होते. त्याचा आधार घेत सिरोंचाजवळ डायनासोरचे जीवाष्म संग्रहालय बनविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ...
नववीत असताना जिवंत साप अगदी लिलया पकडणारी ती आता जंगल संवर्धनासाठी पुढे आलेय. अवघ्या २५ वर्षांच्या वयात तिचं धाडस पाहूनच आपल्या काळजात धडकी भरेल. बिबट्याला पाहून पळून जाणाऱ्यांपैकी ती नाही तर त्याचा फोटो काढण्याची हिंमत बाळगणारी ही सह्याद्रीची सुकन्य ...
मावळ तालुक्यातील अनेक डोंगर वणवे लागून ओसाड झाले आहेत. मात्र एकही डोंगरावर लागलेला वणवा विझविण्यास वन विभागास जमलेले नाही आणि तसे प्रयत्नही वन विभाग करताना दिसत नसल्याची तक्रार अनेक पर्यावरणप्रेमी करीत आहेत. ...
चचेगाव, ता. कऱ्हाड येथे बिबट्याकडून पाच शेळ्या ठार केल्याची घटना मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये चार शेळ्या अन् एक बोकडाचा समावेश आहे. चचेगाव येथील जुने गावठाण परिसरात संभाजी गणपती पवार यांच्या गोठ्यात ही घटना घडली असल्याची माहित ...