पावसाच्या जोरदार सरींनी रविवारी सांगली, मिरज शहराला झोडपून काढले. नदी तसेच धरण पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे पाच तासातच कृष्णा नदीपातळी २.७ फुटांनी वाढ झाली. येत्या दोन दिवसांत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे ...
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. संततधार सुरू असून, धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस कोसळत आहे. ओढे-नाले तुडुंब वाहू लागल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. ...