खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांत मिळून २२.९१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून शनिवारी अडीच ते चार हजार क्युसकेने मुठा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. ...
चासकमान धरण ९६.९० टक्के म्हणजेच ८.३० टिएमसी भरले असून खबरदारीचा उपाय व संभाव्य पावसाची शक्यता गृहीत धरून धरणाचे पाचही दरवाजे चार वाजता उघडून सांडव्याद्वारे ५२७५ क्युसेक्स वेगाने भीमा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...
मानोरा : गेल्या चार ते पाच वर्षापासुन मानोरा तालुक्याला दमदार पावसाची प्रतिक्षा होती. परंतु यावर्षी सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील सिंचन विभागाचे पाच प्रकल्प शंभर टक्के भरुन 'ओव्हर फ्लो' वाहत आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पावसाचा जोर शुक्रवारी कमी राहीला. शहरातही उघडझाप होऊन काहीकाळ सुर्यदर्शनही झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी इंचा-इंचाने कमी होऊन ती सायंकाळपर्यंत ४२.१० फूटांवर राहीली. ...